मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ब्रेक न घेता द्रविड इंग्लंडमध्ये, खेळाडूंना खास गुरूमंत्र; चाहत्यांकडून कौतुक

ब्रेक न घेता द्रविड इंग्लंडमध्ये, खेळाडूंना खास गुरूमंत्र; चाहत्यांकडून कौतुक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 21, 2022 07:06 PM IST

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (icc world test championship) दृष्टीने हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. टीम इंडियाला (team india) र स्पर्धेतील अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे.

team india
team india

भारताला (team idia) १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध (india vs england) एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडिया काही दिवस आधीच इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. यानंतर संघाने लीसेस्टरमध्ये सरावही सुरू केला आहे. या ठिकाणी टीम इंडियाला २४ जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळायचा आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचा हेड कोच संघाचे सराव सत्र घेताना दिसत आहे. त्याच्या देखरेखीखाली टीम इंडिया कसून सराव करताना दिसत आहे. यावेळी कोच द्रविडने खेळाडूंना विजयाचा 'गुरूमंत्र' देखिल दिला आहे.

द्रविडच्या या कामाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनंतर द्रविड इंग्लंडमधील कसोटी संघात सामील झाला आहे. यावेळी त्याला कोणताही ब्रेक मिळाला नाही, या उलट टीमचे बाकीचे खेळाडू आयपीएलमधून ब्रेक घेऊन टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत.

भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळणार आहे. हा सामना २०२१ मध्ये झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. अशात भारताला इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आहे.

तसेच, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. टीम इंडियाला जर स्पर्धेतील अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. भारत या सामन्या पराभूत झाला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारत चौथ्या स्थानावर घसरू शकतो.

WhatsApp channel