Olympics: ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतानं उचललं मोठं पाऊल, आयओसीला पाठवलं पत्र!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Olympics: ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतानं उचललं मोठं पाऊल, आयओसीला पाठवलं पत्र!

Olympics: ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतानं उचललं मोठं पाऊल, आयओसीला पाठवलं पत्र!

Nov 05, 2024 05:54 PM IST

Indian Olympic Association: ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने आयओसीला पत्र पाठवले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आयओएला पाठवले पत्र
ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आयओएला पाठवले पत्र (AP)

Olympics 2036: भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आयओएने २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर भारताने २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीला पत्र पाठवले आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १ ऑक्टोबर रोजी पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारताला सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तान यांसारख्या अनेक देशांचा समावेश आहे, ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी स्वत: ला प्रबळ दावेदार मानले आहे. ही स्पर्धात भारतात व्हावी, अशी इच्छा आयओसीचे प्रमुख थॉमस बाक यांची इच्छा आहे. भारताने यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. ही स्पर्धा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. जर भारताला २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले तर, ही स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित केली जाईल, असे सांगितले जात आहे.

आयओएचे अध्यक्ष पीटी उषा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. भारताला यजमानपद मिळाल्यास योग, खो-खो आणि कबड्डी सारख्या देशी खेळांचा समावेश करण्यावर भर दिला जाईल, असेही समजते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मिशन ऑलिंपिक सेलने (एमओसी) नवीन क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांना ऑलिम्पिकमध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर केला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७८ स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी लाल किल्ल्यावर भाषण करताना खेळाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. यासोबतच नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन भारतात होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केली जातील, असेही त्यांनी म्हटले ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे त्यांनी कौतुक केले. तसेच १४० कोटी देशवासियांच्या वतीने मी आपल्या या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो, असेही म्हटले

Whats_app_banner
विभाग