पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या रोमांचक सामन्यात जर्मनीने ३-२ असा विजय मिळवला आहे. आता भारतीय संघाला कांस्यपदकाचा सामना खेळावा लागणार आहे. तर हॉकीचा अंतिम सामना ८ ऑगस्टला होणार असून त्यात जर्मनीचा सामना नेदरलँडशी होणार आहे.
या पराभवामुळे टीम इंडियाचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. वास्तविक, शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमधील सामना २-२ गोलने बरोबरीत होता, मात्र खेळ संपण्याच्या काही मिनिटांपूर्वीच जर्मनीने एक गोल केला. अशाप्रकारे जर्मनीने ३-२ असा विजय मिळवला. आता भारतीय संघ कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे.
तर अंतिम फेरीत जर्मनीचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. नेदरलंडने पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनचा पराभव केला होता. भारतीय संघ सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरू शकला नसला तरी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. कांस्यपदकासाठी भारताचा सामना स्पेनशी होणार आहे.
या सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये एक गोल करत आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने २ गोल करत भारतावर आघाडी घेतली. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा बरोबरीचा गोल केला, मात्र सामना संपण्याच्या ६ मिनिटे अगोदर जर्मनीने तिसरा गोल केल्याने सामन्यात फरक पडला. अशाप्रकारे सुवर्णपदक जिंकण्यासाठी आता भारतल