मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ U-19 Women's WC : टीम इंडिया वर्ल्डकप फायनलमध्ये, उपांत्य फेरीत बलाढ्य संघाला हरवलं

IND vs NZ U-19 Women's WC : टीम इंडिया वर्ल्डकप फायनलमध्ये, उपांत्य फेरीत बलाढ्य संघाला हरवलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 04:41 PM IST

india beat new zealand U19 world cup : टीम इंडिया अंडर-१९ महिला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. (IND vs NZ U-19 Women's World Cup) उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव केला. भारतीय संघ आता रविवारी (२९ जानेवारी) अंतिम सामन्यात मैदानात उतरणार आहे. ICC तर्फे प्रथमच १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

IND vs NZ U-19 Women's WC
IND vs NZ U-19 Women's WC

india india w vs new zeland w u19 world cup : भारताने चमकदार कामगिरी करत अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होणार आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर १०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने दोन गडी गमावून पूर्ण केले. भारताने हे लक्ष्य १४ षटकात पूर्ण केले भारताकडून उपकर्णधार श्वेता सेहरावतने नाबाद ६१ धावा केल्या. श्वेताने ४५ चेंडूत १० मारले. तर सौम्या तिवारीने २२ धावांची खेळी केली. कर्णधार शेफाली वर्माने या सामन्यात काही विशेष करू शकली नाही.

भारतीय कर्णधार शेफाली वर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. किवी संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि ५ धावांच्या स्कोअरवर त्यांनी दोन्ही सलामीवीरांची विकेट गमावली. 

दोन गडी बाद झाल्यानंतर जॉर्जिया प्लिमर आणि यष्टिरक्षक इसाबेला गेज यांनी ३७  धावांची भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण गेज बाद झाल्यानंतर पुन्हा विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली, जी शेवटच्या षटकापर्यंत सुरू राहिली. परिणामी, न्यूझीलंड संघाला २० षटकांत ९ बाद १०७ धावाच करता आल्या.

न्यूझीलंडकडून प्लिमरने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३२ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकारांसह सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याचवेळी इसाबेल गेजने ४ चौकारांच्या मदतीने २६ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय कॅप्टन इझी शार्प (१३) आणि केली नाइट (१३ धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारतीय संघाकडून पार्श्वी चोप्राने २० धावांत ३  बळी घेतले. टी. साधू, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि अर्चना देवी यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या वर्ल्डकपमधील भारतीय संघाचा प्रवास

पहिला सामना (ग्रुप मॅच)- दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सनी पराभव केला

दुसरा सामना (ग्रुप मॅच)- UAE ला १२२ धावांनी हरवलं

तिसरा सामना (ग्रुप मॅच)- स्कॉटलंडला ८३ धावांनी हरवलं

चौथा सामना- ऑस्ट्रेलियाकडून ७ विकेट्सनी पराभव

पाचवा सामना- श्रीलंकेचा ७ विकेट्सनी पराभव केला

सहावा सामना (सेमी फायनल)- न्यूझीलंडसा ८ विकेट्सनी हरवले

WhatsApp channel