मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पराभव पचला नाही, अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीयांना धक्काबुक्की! व्हिडीओ…

पराभव पचला नाही, अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीयांना धक्काबुक्की! व्हिडीओ…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 12, 2022 05:21 PM IST

या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एएफसी आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या आयोजन समितीनेही याविषयी काहीही स्पष्ट केलेले नाही.

India vs Afghanistan Fight
India vs Afghanistan Fight (hindustan)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी AFC आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर २-१ अशी मात करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. 

भारतीय संघाच्या या विजयानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू संतप्त झाले. त्यांनी भर मैदानातच भारतीय खेळाडूंशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा सामना कोलकात्याच्या व्हीवायबीके स्टेडियमवर खेळवला गेला.

सामना गमावल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध संताप व्यक्त केला. व्हायरल व्हिडिओमध्ये ३ अफगाणिस्तानी आणि २ भारतीय खेळाडू सुरुवातीला धक्काबुक्की करताना दिसत आहेत. भारताचा गोलकीपर गुरप्रीत सिंगने दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यालाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी धक्काबुक्की केली. हे दृश्य पाहून एएफसीचे अधिकारी मैदानावर धावले. मात्र तरीही हे प्रकरण आणखीनच वाढत गेले.

या वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एएफसी आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या आयोजन समितीनेही याविषयी काहीही स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान, स्पर्धेच्या D गटातील चुरशीच्या लढतीत भारताने अफगाणिस्तानला २-१ ने पराभूत करून महत्त्वाचे तीन गुण मिळवले आहेत. सुनील छेत्रीने फ्री-किकवर एक गोल केला. यानंतर अफगाणिस्ताननेही एक गोल करून सामन्यात पुनरागमन केले होते, मात्र शेवटी सहल अब्दुल समदने एक गोल करून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग