मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsWI : शुभमन गिलचं वनडेत पहिलं अर्धशतक, सचिनला टाकले मागे
शुभमन गिल
शुभमन गिल (फोटो - बीसीसीआय ट्विटर)

INDvsWI : शुभमन गिलचं वनडेत पहिलं अर्धशतक, सचिनला टाकले मागे

23 July 2022, 14:29 ISTSuraj Sadashiv Yadav

वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक करून शुभमन गिलने सचिनला मागे टाकलं असलं तरी त्याच्यापुढे विराटचे नाव या यादीत टॉपला आहे

IND vs WI ODI Series: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन धावांनी विजय मिळवला. भारतान पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकात ३०८ धावा केल्या. यात कर्णधार शिखर धवन, शुभमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ३०५ धावा करता आल्या. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. त्याचं एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलंच अर्धशतक ठरलं. या विक्रमासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एक विक्रम मागे टाकला. वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक कऱणारा तो भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सचिनला मागे टाकलं आहे. शुभमन गिलने २२ वर्षे ३१७ दिवस वय असताना पहिलं अर्धशतक केलं आहे. याआधी सचिनने वेस्ट इंडिजमध्ये वयाच्या २४ व्या वर्षी अर्धशतक केलं होतं.

शुभमन गिलने सचिनला मागे टाकलं असलं तरी त्याच्यापुढे विराटचे नाव या यादीत टॉपला आहे. कोहलीने २०१० मध्ये २२ वर्षे २०१५ दिवस इतकं वय असताना वेस्ट इंडिजमध्ये अर्धशतक केलं होतं. असं कऱणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

शुभमन गिलने आतापर्यंत केवळ तीनच एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने ३१ जानेवारी २०१९ रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर २ डिसेंबर २०२० ला याआधीचा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आता वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर दीड वर्षानंतर त्याला संघात संधी मिळाली आहे. शुभमन गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६४ धावांची खेळी केली होती. त्यानं जर पुढच्याही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर संघातील स्थान पक्कं कऱण्यासाठी त्याला संधी असणार आहे.