मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना, भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

IND vs WI: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना, भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 23, 2022 07:38 AM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ३ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

IND vs WI
IND vs WI

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला ५० षटकात ६ बाद ३०५ धावा करता आल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने ३ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजकडून काइल मेयर्सने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर ब्रूक्सने ४६ धावा केल्या. याशिवाय ब्रेंडन किंगने ६६ चेंडूत ५४ धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरनने २५ तर अकिल होसिनने ३३ धावांची खेळी केली. अकील आणि शेफर्डने सातव्या गड्यासाठी अर्धशतकी खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना थोडक्यात अपयश आलं आणि विंडिजला विजयाने हुलकावणी दिली. भारतात्या सिराज, चहल आणि ठाकुर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारताने ५० षटकांत ७ विकेट गमावून ३०८ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ९७ धावा केल्या. त्ययानंतर शुभमन गिलने ६४ धावांचे योगदान दिले. शुभमन आणि शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. शुभमन गिल धावबाद झाला. 

त्यानंतर श्रेयस अय्यरने धवनला उत्तम साथ दिली. अय्यरने ५४ धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि दीपक हुडा अपयशी ठरले. दीपक हुडा ३२ चेंडूत २७, सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत १३ आणि संजू सॅमसनने १८ चेंडूत १२ धावा केल्या.

टीम इंडियाने ३५ षटकातच २२५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताची धावसंख्या ३५० च्या जवळ जाईल असे वाटत होते, परंतु मधल्या फळीतील अपयशामुळे शेवटच्या १५ षटकात केवळ ८३ धावा झाल्या. 

शेवटी शार्दुल ठाकूर ७ आणि मोहम्मद सिराज एक धावा काढून नाबाद राहिला. तत्पूर्वीअक्षर पटेलने २१ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. तर वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी २ बळी घेतले. रोमारियो शेफर्ड आणि अकील हुसेन यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

 

WhatsApp channel