मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI: टीम इंडिया १३८ धावांवर ऑलआऊट, ओबेड मॅकॉयचे ६ विकेट्स

IND vs WI: टीम इंडिया १३८ धावांवर ऑलआऊट, ओबेड मॅकॉयचे ६ विकेट्स

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 02, 2022 12:56 AM IST

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला.

IND vs WI
IND vs WI

IND vs WI T20: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाला १९.४ षटकांत १३८ धावांत गुंडाळले आहे. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. रवींद्र जडेजाने २७ आणि रिषभ पंतने २५ धावांचे योगदान दिले. 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. अकिल हुसेनने ओबेद मॅकॉयच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुर्यकुमार यादवही तिसर्‍या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला.त्यालाही ओबेद मॅकॉयने बाद केले. यादव विकेटकीपर डेव्हन थॉमसकरवी झेलबाद झाला. सूर्यकुमारने ६ चेंडूंत ११ धावा केल्या.

त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने काही काळ बाजू लावून धरली. मात्र, तेही जास्तवेळ मैदानावर राहू शकले नाहीत. सातव्या षटकात भारताला चौथा धक्का बसला. तिसऱ्या चेंडूवर अकिल हुसेनने पंतला ओडेन स्मिथच्या हाती झेलबाद केले. पंतने १२ चेंडूत २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. पंत झटपट धावा काढत होता, पण अकीलला षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर हार्दिक आणि जडेजाने भारतीय संघाला शंभरी गाठून दिली. 

हार्दिकने ३१ चेंडूत ३१ धावा केल्या. तर जडेजाने ३० चेंडूत २७ धावा केल्या. दिनेश कार्तिकच्या बॅटमधून ७ धावा आल्या. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉयने चार षटकांत १७ धावा देत सहा बळी घेतले. जेसन होल्डरला दोन विकेट्स मिळाले.

WhatsApp channel