मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI : 'असं' पहिल्यांदाच घडलं असेल, 'या' कारणामुळे सामन्याची वेळ बदलली

IND vs WI : 'असं' पहिल्यांदाच घडलं असेल, 'या' कारणामुळे सामन्याची वेळ बदलली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 01, 2022 07:17 PM IST

टीम इंडियाची नजर मालिकेत सलग दुसऱ्या विजयावर आहे. २९ जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघ सेंट किट्सच्या बॅसेटेरे येथे प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.

ind vs wi
ind vs wi

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना सोमवारी (१ ऑगस्ट) सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या वेळेत बदल केला आहे. आता हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ ऐवजी रात्री १० वाजता सुरू होईल. वास्तविक, खेळाडूंचे सामान सेंट किट्सला उशिरा पोहोचले. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला हा निर्णय घ्यावा लागला.

टीम इंडियाची नजर मालिकेत सलग दुसऱ्या विजयावर आहे. २९ जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघ सेंट किट्सच्या बॅसेटेरे येथे प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३ विजय आणि २ पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, २०१७ पासून भारत वेस्ट इंडिजमध्ये हरलेला नाही. भारताचा शेवटचा पराभव २०१७ मध्ये किंग्स्टन येथे झाला होता. 

शेवटच्या दोन T20 सामन्यांबाबत सस्पेंस-

मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. मात्र, आता या सामन्यांमध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली. भारतीय खेळाडूंच्या व्हिसाच्या अडचणींमुळे आता कॅरेबियन क्रिकेट बोर्ड उरलेले दोन्ही सामने वेस्ट इंडिजमध्येच खेळवण्याचा विचार करत आहे.

एका रिपोर्टनुसार, दोन्ही संघांना अद्यापही अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजला पर्यायी योजना आखावी लागणार आहे. हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, परंतु भारत आणि वेस्ट इंडिज संघातील अनेक सदस्यांना अमेरिकेचा व्हिसा अजूनही मिळालेला नाही.

एका सूत्राने सांगितले की, “व्हिसा समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हे सामने वेस्ट इंडिजमध्येही होऊ शकतात. भारतीय संघाला सेंट किट्समध्येच व्हिसा दिला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विंडीजविरुद्ध T20I साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, भुवनेश यादव, खान, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग.

WhatsApp channel