मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya पोहोचला जिगरी दोस्ताच्या घरी, फोटो शेअर करुन म्हणाला...

Hardik Pandya पोहोचला जिगरी दोस्ताच्या घरी, फोटो शेअर करुन म्हणाला...

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 04, 2022 10:04 PM IST

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्ड याच्या घरी भेट दिली. पांड्याने पोलार्डच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Hardik Pandya
Hardik Pandya

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडीज संघ आणि टीम इंडियाचे काही सदस्य फ्लोरिडाला पोहोचले आहेत. तसेच, अन्य काही खेळाडू अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यानंतर रवाना होतील.

तिसऱ्या सामन्यानंतर खेळाडूंना त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे. कारण चौथा सामना ४ दिवसांनी खेळवला जाणार आहे. या अंतरामुळे भारतीय खेळाडूंना क्रिकेटपासून थोडी विश्रांती मिळाली आहे.

दरम्यान, संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा महान खेळाडू किरॉन पोलार्ड आणि त्याचे कुटुंबीय दिसत आहेत. या पोस्टमध्ये हार्दिक पांड्याने लिहिले की, “कोणताही कॅरेबियन दौरा किंगच्या घरी गेल्याशिवाय पूर्ण होणारा नाही. माझा आवडता पॉली आणि त्याच्या सुंदर कुटुंबाने माझे आदरातिथ्य केल्याबद्दल धन्यवाद."

हार्दिक पांड्या गेल्या काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये त्याने भारताला अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

WhatsApp channel