IND vs WI 3rd T20 Match Preview : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज (८ ऑगस्ट) तिसरा टी-20 सामना होणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने गमावले आहेत. त्यामुळे मालिकेत जिवंत राहायचे असेल तर आजचा सामना जिंकणे संघासाठी महत्वाचे आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजची नजर आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यावर असेल.
विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजने २०१६ पासून भारताविरुद्ध एकही T20I मालिका जिंकलेली नाही. आता वेस्ट इंडिजला मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे.
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत २७ सामने झाले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने १७ सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजने ९ सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामन्याचा निकाल लागला लागला.
गयाना येथील याच मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळला गेला, जो यजमानांनी दोन गडी राखून जिंकला. फिरकीपटूंना येथे मदत मिळते. तथापि, लक्ष्याचा पाठलाग करणे येथे थोडे सोपे आहे. हे पाहता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
कागदावर वेस्ट इंडिजचा संघ खूप मजबूत दिसत आहे, त्यांच्याकडे अनेक मॅचविनर्सदेखील आहेत. तर सलग दोन पराभवानंतर टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. कुलदीप यादवच्या पुनरागमनाने टीम इंडिया आणखी मजबूत होईल, कारण वेस्ट इंडिजने दोन्ही टी-20 सामने जिंकले असले तरी भारतीय फिरकीपटूंसमोर ते फेल ठरले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आजचा सामना जिंकण्याची अधिक संधी आहे.
इशान किशन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन/अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
वेस्ट इंडिजचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
संबंधित बातम्या