मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA ODI Series: भारत-आफ्रिका संघांसह संपूर्ण वेळापत्रक; पाहा वनडे मालिकेबद्दल सर्व माहिती

IND vs SA ODI Series: भारत-आफ्रिका संघांसह संपूर्ण वेळापत्रक; पाहा वनडे मालिकेबद्दल सर्व माहिती

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 06:39 PM IST

IND vs SA ODI Series schedule: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याच दिवशी भारताचा T20 विश्वचषक संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

IND vs SA ODI Series
IND vs SA ODI Series

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ३ T20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघाने आता ODI मालिकेची तयारी सुरू केली आहे. ही तीन वनडे सामन्यांची मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याच दिवशी भारताचा T20 विश्वचषक संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. म्हणजेच भारतीय संघातील टॉप-१५ खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग असणार नाहीत.

भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक

उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तर दुसरा सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर ९ ऑक्टोबरला होईल आणि तिसरा सामना ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

सामना कधी आणि कुठे पाहणार?

भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर होणार आहे. तर डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

दोन्ही संघ

टीम इंडिया:

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, मुकेश कुमार आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका:

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, जानेमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वायने पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी.

WhatsApp channel

संबंधित बातम्या