मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK: भारताचं टेन्शन वाढलं? बाबर, इफ्तिकारसह पाकिस्तानचे सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये!

IND vs PAK: भारताचं टेन्शन वाढलं? बाबर, इफ्तिकारसह पाकिस्तानचे सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 31, 2023 02:06 PM IST

Asia Cup 2023: नेपाळविरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

Babar Azam vs Rohit Sharma
Babar Azam vs Rohit Sharma

India vs Pakistan: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिकार अहमदच्या वादळी शतकांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने नेपाळसमोर ३४३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ अवघ्या १०४ धावांवर ढेपाळला. पाकिस्तानच्या या मोठ्या विजयाने भारताचे टेन्शन वाढवले. नेपाळविरुद्ध सामन्यात पाकिस्तानचे सगळ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या ०२ सप्टेंबर २०२३ ला सामना होणार आहे. मात्र, पाकिस्तानने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिले आहे की, त्यांचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूचा फॉर्म पाहता भारतीय खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

नेपाळविरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या संघाने अवघ्या २५ धावांवर २ विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार बाबर आझमने संघाचा डाव संभाळला. बाबरने ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात बाबर आझमने १५१ धावा केल्या. बाबरचा सर्वोत्तम फॉर्म भारतासाठी मोठी अडचण ठरू शकते. एवढेच नाही तर इफ्तिकार अहमदने अवघ्या ७१ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. इफ्तिकार अहमदचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. इफ्तिकारच्या या खेळीमुळे पाकिस्तानच्या मधल्या फळीचा प्रश्न सुटलेला दिसतोय.

नेपाळविद्ध सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पूर्वीप्रमाणेच उत्कृष्ट फॉर्म दाखवला. शाहीन आफ्रिदीने त्याच्या पहिल्याच षटकातच दोन विकेट घेतल्या. नसीम शाहनेही त्याच्या पहिल्याच षटकात एक विकेट घेतली. हारिस रौफने मधल्या षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच्या खात्यातही दोन विकेट्स जमा झाल्या. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनीही दाखवून दिले की, भारतीय फलंदाजांना त्यांचे आव्हान पेलणे सोपे जाणार नाही. शादाब खानने ६.४ षटकात २७ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. नेपाळविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या सगळ्याच खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. नेपाळवर मोठा विजय नोंदवत पाकिस्तानने भारतालाही इशारा दिला.

WhatsApp channel

विभाग