मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ T20 Playing-11 : पृथ्वी शॉ की शुभमन… ओपिनंग कोण करणार? हार्दिकनं स्पष्टच सांगितलं

IND vs NZ T20 Playing-11 : पृथ्वी शॉ की शुभमन… ओपिनंग कोण करणार? हार्दिकनं स्पष्टच सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2023 11:05 AM IST

India vs New Zealand 1s t20 match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आज (२७ जानेवारी) रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीला कोण खेळणार हे कर्णधार पंड्याने आधीच निश्चित केले आहे.

IND vs NZ T20 Playing-11
IND vs NZ T20 Playing-11

India vs New Zealand T20 Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज (२७ जानेवारी) रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीला कोण खेळणार हे कर्णधार हार्दिक पांड्याने आधीच निश्चित केले आहे. पृथ्वी शॉला आणखी प्रतीक्षा करावी लागेल, असेही तो म्हणाला.

टीममध्ये पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉपेक्षा फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला प्राधान्य दिले जाईल, असे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने गुरुवारी सांगितले. गिलचा वनडेतील उत्कृष्ट फॉर्म पाहता त्याची निवड निश्चित असल्याचे हार्दिकने सांगितले.

गिलने गेल्या ४ डावांमध्ये द्विशतकासह ३ शतके झळकावली, गिल आणि इशान किशन डावाची सुरुवात करतील. हार्दिकने पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सांगितले की, 'शुबमनने चमकदार कामगिरी केली आहे आणि तो डावाची सुरुवात करेल.' 

त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते. त्रिपाठीने श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. T20 चा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आणि हार्दिक पाचव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळू शकते.

तर वेगवान गोलंदाजीत श्रीलंकेविरुद्ध चमकदार पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि तुफानी गोलंदाज उमरान मलिक यांनाही संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. तर फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत

शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, इश सोढी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी.

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20 - २७ जानेवारी, रांची

दुसरा T20 - २७ जानेवारी, लखनौ

तिसरा T20 - १ फेब्रुवारी, अहमदाबाद

WhatsApp channel