मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL Schedule : भारत-न्यूझीलंड सामने ‘या’ चॅनल-अ‍ॅपवर दिसणार, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक, पाहा

IND vs SL Schedule : भारत-न्यूझीलंड सामने ‘या’ चॅनल-अ‍ॅपवर दिसणार, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2023 07:56 PM IST

India vs new zealand odi and t20 full schedule : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका इद्या बुधवारपासून (१८ जानेवारी) सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

India vs new zealand odi series
India vs new zealand odi series

India vs new zealand full schedule : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका इद्या बुधवारपासून (१८ जानेवारी) सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला होता. त्याचवेळी न्यूझीलंडने पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. वनडेत दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. 

सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १८ जानेवारी रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

भारत-न्यूझीलंड मालिका कोणत्या चॅनलवर दिसणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. 

भारत-न्यूझीलंड मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग या अॅपवर होणार?

याशिवाय चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. मात्र, डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारचे सामने प्लॅनशिवाय पाहता येणार नाहीत.

दोन्ही संभाव्य संघ

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मोहम्मद शमी

न्यूझीलंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, सँटनर, ईश सोढी, फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि डग ब्रेसवेल

भारत-न्यूझीलंड मालिका (संपूर्ण वेळापत्रक):

वनडे मालिका

पहिला एकदिवसीय - १८ जानेवारी, हैदराबाद

दुसरी वनडे - २१ जानेवारी, रायपूर

तिसरी एकदिवसीय - २४ जानेवारी, इंदूर

टी-२० मालिका

पहिला T20 - २७ जानेवारी, रांची

दुसरा T20 - २९ जानेवारी, लखनौ

तिसरा T20 - १ फेब्रुवारी, अहमदाबाद

 

WhatsApp channel