मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ ODI Highlights : टीम इंडिया वनडेमध्ये नंबर वन, मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा

IND vs NZ ODI Highlights : टीम इंडिया वनडेमध्ये नंबर वन, मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2023 02:26 PM IST

IND vs NZ ODI Highlights : इंदूर वनडेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला आहे. यासह भारताने ३ सामन्यांची वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे. आता भारत आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर-१ वर पोहोचला आहे, आतापर्यंत न्यूझीलंड नंबर-१ वर होता.

IND vs NZ ODI Live score update
IND vs NZ ODI Live score update

IND VS NZ 3rd ODI Score Updates : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना ९० धावांनी जिंकला आणि मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकली. 

भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघ केवळ २९५ धावाच करू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. परंतु दुसरा विकेट पडल्यानंतर त्यांचे नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेले. शेवटी २९५ धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला.

न्यूझीलंडसाठी डेव्हन कॉनवेने शतक झळकावले. त्याने १०० चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३८ धावा केल्या. मात्र, त्याला समोरून कोणीही साथ देऊ शकले नाही. त्यामुळे  शेवटी न्यूझीलंडने सामना आणि मालिका गमावली.

भारताकडून या सामन्यात शुभमन गिलने ११२, रोहित शर्माने १०१ आणि हार्दिक पांड्याने ५४ धावा केल्या. 

आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ रांची येथे २७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या  मालिकेत भिडतील.

8:50: IND vs NZ 3rd ODI Live: न्यूझीलंडची नववी विकेट पडली

२८० धावांवर न्यूझीलंडची नववी विकेट पडली. युझवेंद्र चहलने जेकब डफीला पायचीत केले. आता भारतीय संघ विजयापासून एक विकेट दूर आहे. हा सामना जिंकताच टीम इंडिया आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येईल.

8:10: IND vs NZ 3rd ODI Live: डेवॉन कॉनवे बाद

२३० धावांवर न्यूझीलंडची सहावी विकेट पडली. उमरान मलिकने डेव्हॉन कॉनवेला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. रोहित शर्माने कॉनवेचा झेल टिपला. त्याने १०० चेंडूत १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३८ धावा केल्या. आता मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल ही जोडी क्रीझवर आहे. न्यूझीलंडची धावसंख्या ३३ षटकांत ६ बाद २३७ अशी आहे.

7:49: IND vs NZ 3rd ODI Live: न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत

न्यूझीलंडचा निम्मा संघ २०० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शार्दुल ठाकूरने ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याची ही तिसरी विकेट आहे. ग्लेन फिलिप्सने ७ चेंडूत ५ धावा केल्या. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. डेव्हॉन कॉनवे आणि मायकेल ब्रेसवेल सध्या क्रीजवर आहेत. ३० षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद २२३ आहे.

5:54: IND vs NZ 3rd ODI Live: न्यूझीलंडची खराब सुरुवात

३८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलन शुन्यावर बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला क्लीन बोल्ड केले

5:510: IND vs NZ 3rd ODI Live: ५० षटकात भारताच्या ३८५ धावा

भारताने प्रथम फलंदाजी करताना ३८५ धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला आणि निर्धारित ५० षटकांचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या नऊ गडी बाद ३८५ अशी झाली. इंदूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असून येथे मोठे फटके सहज खेळता येतात. जर न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला तर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याचे भारताचे स्वप्न भंगणार आहे.

रोहित आणि गिलने मोठ्या लक्ष्याचा पाया रचला

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित आणि गिल जोडीने पॉवरप्लेमध्ये ८२ धावा ठोकल्या. यानंतरही दोघे थांबले नाहीत. दोघांंनी पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. डावाच्या २७व्या षटकात ८५ चेंडूत १०१ धावा करून रोहित बाद झाला. त्याचवेळी पुढच्या षटकात गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने ७८ चेंडूत ११२ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा अडचणीत आला. कारण कोहली ३६, किशन १७ आणि सूर्यकुमार यादव १४ हे अगदी स्वस्तात बाद झाले. भारताने ८१ धावांत पाच विकेट गमावल्या. वॉशिंग्टन सुंदरही नऊ धावा करून बाद झाला.

त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय डाव सांभाळला. शार्दुल २५ आणि हार्दिक ५४ धावा करून बाद झाला. हार्दिक क्रीझवर होता तोपर्यंत भारताची धावसंख्या ४०० धावांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा होती, पण ४९व्या षटकात तो बाद झाला आणि भारतीय संघ नऊ गडी गमावून ३८५ धावा करू शकला.

न्यूझीलंडकडून ब्लेअर टिकनर आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेलला एक विकेट मिळाली.

5:00 : IND vs NZ 3rd ODI Live: भारताची सातवी विकेट पडली

३६७ धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. शार्दुल ठाकूर १७ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. त्याला ब्लेअर टिकनरने लॅथमच्या हाती झेलबाद केले. शार्दुलने आपल्या खेळीत ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

4:54: IND vs NZ 3rd ODI Live : भारताच्या ३५० धावा 

भारताने ३५० धावांचा टप्पा गाठला आहे. भारताच्या सध्या ४७ षटकांंनंतर ६ बाद ३५२ धावा झाल्या आहेत. ३१३ धावांवर भारताची सहावी विकेट पडली. वॉशिंग्टन सुंदर १४ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. त्याला ब्लेअर टिकनरच्या चेंडूवर डॅरिल मिशेलने झेलबाद केले. आता शार्दुल ठाकूर हार्दिक पांड्यासोबत क्रीजवर आहेत.

4:17: IND vs NZ 3rd ODI Live : भारताचा अर्धा संघ तंबूत

भारताचा निम्मा संघ २९३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शानदार फलंदाजीनंतर विराट कोहली, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. सूर्यकुमार यादव नऊ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले. जेकब डफीच्या गोलंदाजीवर त्याला डेव्हन कॉनवेने झेलबाद केले. आता वॉशिंग्टन सुंदर हार्दिक पांड्यासोबत क्रीजवर आहे. ४० षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात २९८ आहे.

3:59 : IND vs NZ 3rd ODI Live: भारताची तिसरी विकेट पडली

२६८ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. इशान किशन २४ चेंडूत १७ धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

3:25: IND vs NZ Live Score: रोहित-शुभमनची शतकं

भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकं झळकावली आहेत. रोहित शर्माने ८१ चेंडूत तर शुभमन गिलने ७२ चेंडूत शतक पूर्ण केले.

2:42 : IND vs NZ Live Score: भारताची धावसंख्या १५० च्या पुढे

भारतीय सलामीवीर आक्रमक फलंदाजी करत आहेत. भारताने बिनबाद १५० धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि रोहित शर्मा जबरदस्त टचमध्ये दिसत आहेत.  दोन्ही फलंदाज आपापल्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत आहेत. यासह भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

2:29 IND vs NZ Live Score: रोहित-शुभमनची अर्धशतकं

शुभमन गिलनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. रोहितचे वनडे कारकिर्दीतील हे ४९ वे अर्धशतक आहे. रोहित आणि गिल यांनी पुन्हा एकदा अप्रतिम भागीदारी केली आहे. दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करून दिली. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद १२८ आहे.

2:05 : IND vs NZ Live Score: भारताच्या ५० धावा पूर्ण

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. आठव्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर शुभमन गिलने लॉकी फर्ग्युसनला चौकार मारून भारताला ५० धावांच्या पुढे नेले. शुभमनने या षटकात चार चौकारांसह षटकार लगावला. 

भारताने ८ षटकांत एकही बिनबाद ६४ धावा केल्या आहेत. शुभमन गिल २४ चेंडूत ४१ तर रोहित शर्मा २४ चेंडूत नाबाद २१ धावांवर खेळत आहे.

1:32 : IND vs NZ Live SCORE: भारताचा डाव सुरू 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल क्रीझवर आला आहे. न्यूझीलंडसाठी जेकब डफीने गोलंदाजीची सुरुवात केली. हा त्याचा तिसरा एकदिवसीय सामना आहे. त्याने आतापर्यंत ४ विकेट घेतल्या आहेत.

1:10 : IND vs NZ Live Score: दोन्ही संघांच्या प्लेइंग ११

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

1: 05 : IND vs NZ Live Score: भारतीय संघ फलंदाजी करणार

इंदूरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. न्यूझीलंडने संघात एक बदल केला आहे. त्यांनी वेगवान गोलंदाज शिपलीला वगळले आहे. त्याच्या जागी जेकब डफी संघात आला आहे. तर दुसरीकडे, भारताने दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला संघात संधी देण्यात आली आहे.

12:50 : IND vs NZ Live Score : इंदूरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडणार

इंदूरच्या होळकर स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर या स्टेडियमची क्षमता सुमारे ३० हजार प्रेक्षकांची आहे. त्याचवेळी होळकर स्टेडियमची सीमारेषा तुलनेने खूपच लहान आहे. या मैदानावर आतापर्यंत २ कसोटी सामने, ५ वनडे आणि ३ टी-20 सामने खेळले गेले आहेत.

12:40 : IND vs NZ Live Score : इंदूरचं हवामान

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी दुपारी इंदूरचे हवामान तुलनेने उबदार राहू शकते. यावेळी तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सायंकाळनंतर तापमानात घट होईल. संध्याकाळी तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअस असू शकते. याशिवाय पावसाची अजिबात शक्यता नाही.

12:35 : IND vs NZ Live Score : इंदूरमध्ये भारत अद्याप हरलेला नाही

टीम इंडिया २०१७ नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाला वनडेत अद्याप पराभव पत्करावा लागला नाही. अशा परिस्थितीत हाच फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष असेल.

 

WhatsApp channel