मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ T20 : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या किती माहितीय का? येथे धावांचा पाऊस पडतो

IND vs NZ T20 : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या किती माहितीय का? येथे धावांचा पाऊस पडतो

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 09, 2023 05:31 PM IST

ind vs nz 3rd t20 pitch report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक T20 सामना आज बुधवारी (१ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

ind vs nz 3rd t20 pitch report
ind vs nz 3rd t20 pitch report

india vs new zealand 3rd t20 match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-२० सामना आज (१ फेब्रुवारी) बुधवारी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असून मालिकेच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

टीम इंडियाने दोन वर्षांपासून टी-20 मालिका गमावलेली नाही

भारतीय संघाने दोन वर्षांपासून एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा मालिका पराभव जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेत झाला होता. श्रीलंकेने त्यांच्या घरच्या मैदानावर भारताचा २-१ असा पराभव केला होता.

पीच रिपोर्ट

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. या मैदानावरील ६ टी-२० सामन्यांच्या १२ डावांमध्ये १० वेळा १५०+ धावा झाल्या आहेत. यामध्ये, ५ वेळा संघांनी १८० हून अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. फलंदाजांसाठी उपयुक्त पीचवर धावांचा पाऊस पडू शकतो.

टॉस किती महत्त्वाचा असेल?

आतापर्यंत येथे झालेल्या ६ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकले असले तरी ते एकतर्फी जिंकले आहेत. अशा परिस्थितीत येथे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

अहमदाबादचे हवामान कसे असेल?

सामन्यादरम्यान अहमदाबादचे हवामान क्रिकेट खेळण्यासाठी योग्य असेल. तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील. पावसाचीही शक्यता नाही. अशा स्थितीत सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल.

तिसर्‍या T20 साठी दोन्ही संंभाव्य संघ

भारताची प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, पृथ्वी शॉ / इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शिवम मावी, अर्शदीप सिंग

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन-

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डिरेल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

WhatsApp channel