मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 3rd ODI : रोहित-विराट शेवटचा वनडे खेळणार नाहीत? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohli

IND vs NZ 3rd ODI : रोहित-विराट शेवटचा वनडे खेळणार नाहीत? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

22 January 2023, 16:05 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma Virat Kohli ind vs nz 3rd odi : टीम इंडियाला २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी एका वसीम जाफरने रोहित-विराटला मोलाचा सल्ला दिला आहे.

Virat Kohli And Rohit Sharma : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित-विराटने हा सल्ला पाळल्यास ते वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

जाफरनं दिला मोलाचा सल्ला

टीम इंडियाला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे, जेणेकरून त्यांना कसोटी मालिकेपूर्वी लय मिळेल, असे वसीम जाफरचे मत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना वसीम जाफर म्हणाला की, 'मला वाटते रोहित-विराटने रणजी ट्रॉफी खेळणे हे खूप अर्थपूर्ण ठरेल.

जर त्यांनी एक रणजी सामना खेळला तर त्यांला दोन डाव मिळतील जे नक्कीच फायदेशीर ठरले. तुम्ही कितीही अनुभवी असलात, तरी तुम्हाला सामन्याच्या वेळी लय पकडणे गरजेचे असते, विशेषत: लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये".

टीम इंडियाला टेस्टमध्ये नंबर वन बनण्याची संधी

वसीम जाफर पुढे म्हणाला, 'ही सर्व दृष्टिकोनातून एक मोठी मालिका आहे, मग ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल असो ज्यामध्ये भारत आपले स्थान बनवू शकतो किंवा जगातील नंबर-वन कसोटी संघ बनू शकतो. भारताला जे काही करता येईल ते करणे आवश्यक आहे, त्यामुळे ते पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार असायला हवेत. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही; रोहित आणि इतर अनेक खेळाडूंचीही तीच अवस्था आहे.

एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना रवी शास्त्रींही हेच म्हटले होते. "मला वाटते की विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा वनडे खेळू नये आणि बॉर्डर गावस्कर मालिकेच्या तयारीसाठी रणजी सामना खेळावा."