मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ ODI : होळकर स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडणार! असं असेल इंदूरचं हवामान आणि पीच रिपोर्ट

IND vs NZ ODI : होळकर स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडणार! असं असेल इंदूरचं हवामान आणि पीच रिपोर्ट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2023 11:02 AM IST

IND vs NZ 3rd ODI, Pitch Report & Weather Forecast : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल निश्चित मानले जात आहेत.

IND vs NZ 3rd ODI, Pitch Repor
IND vs NZ 3rd ODI, Pitch Repor

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (२४ जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत 'मेन इन ब्लू'ने हा सामना जिंकल्यास त्यांना नंबर-वन होण्याची संधी आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया उमरान मलिकला मोहम्मद शमीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकते. तर न्यूझीलंडचा संघ २ बदलांसह मैदानात उतरू शकतो. इंदूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघ हेन्री शिपलीच्या जागी डग ब्रेसवेल आणि ब्लेअर टिकननच्या जागी जेकब डफलीचा संघात समावेश करू शकते.

सामन्याच्या दिवशी पाऊस पडेल का?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारी दुपारी इंदूरचे हवामान तुलनेने उबदार राहू शकते. यावेळी तापमान २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सायंकाळनंतर तापमानात घट होईल. संध्याकाळी तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअस असू शकते. याशिवाय पावसाची अजिबात शक्यता नाही.

इंदूरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडणार

इंदूरच्या होळकर स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर या स्टेडियमची क्षमता सुमारे ३० हजार प्रेक्षकांची आहे. त्याचवेळी होळकर स्टेडियमची सीमारेषा तुलनेने खूपच लहान आहे. या मैदानावर आतापर्यंत २ कसोटी सामने, ५ वनडे आणि ३ टी-20 सामने खेळले गेले आहेत.

दोन्ही संभाव्य प्लेइंग ११

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज

न्यूझीलंड

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स/मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी

WhatsApp channel

संबंधित बातम्या