मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 2nd T20 : लखनौमध्ये पडतो चौकार-षटकारांचा पाऊस! ४०० धावा निघू शकतात, पाहा पीच रिपोर्ट

IND vs NZ 2nd T20 : लखनौमध्ये पडतो चौकार-षटकारांचा पाऊस! ४०० धावा निघू शकतात, पाहा पीच रिपोर्ट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 28, 2023 06:35 PM IST

India vs New Zealand Match preview : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. मालिका वाचवण्यासाठी हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे.

IND vs NZ 2nd T20
IND vs NZ 2nd T20

IND vs NZ 2nd T20 pitch report : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (२९ जानेावरी) रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो' सामना असेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला लखनौ येथील सामना जिंकावाच लागणार आहे.

पीच रिपोर्ट

लखनौच्या ल अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय काहीसे एकतर्फी झाले आहेत. अशा परिस्थितीत या विकेटवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी दुसऱ्या डावात दव गोलंदाजांना अडचणी निर्माण करू शकते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय घेणे कर्णधारासाठी सोपे नसणार आहे.

लखनौचे हवामान कसे असेल?

लखनौमधील सामन्यादरम्यान तापमान १३ ते १५ अंशांदरम्यान राहील. सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. 

लखनौमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे?

भारतीय संघाने लखनौमध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत. हे दोन्ही भारताने सामने जिंकले आहेत. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९०+ धावा केल्या आहेत. भारताने याआधी येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

रांची येथील सामन्यात काय घडलं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळला गेला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डेव्हन कॉनवे (५२) आणि डॅरिल मिशेल (५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित षटकापर्यंत केवळ १५५ धावाच करू शकला. अशाप्रकारे किवी संघाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

WhatsApp channel