मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 2nd T20I : लखनौ येथे टॉस बनणार बॉस, आधी फलंदाजी करणारा संघच जिंकतो! रंजक आकडेवारी, पाहा

IND vs NZ 2nd T20I : लखनौ येथे टॉस बनणार बॉस, आधी फलंदाजी करणारा संघच जिंकतो! रंजक आकडेवारी, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 29, 2023 10:00 AM IST

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (२९ जानेावरी) रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो' सामना असेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला लखनौ येथील सामना जिंकावाच लागणार आहे.

IND vs NZ 2nd T20I
IND vs NZ 2nd T20I

Toss Role in IND vs NZ 2nd T20I : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (२९ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजेपासून खेळवला जाणार आहे.. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होणार आहे. या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकणारा संघच या मैदानावरील सामना जिंकतो, हे अनेकवेळा दिसून आले आहे.

वास्तविक, लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हे सर्व विजय एकतर्फी मिळाले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये येथे पहिल्यांदा टी-20 सामना खेळला गेला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या सामन्यात टीम इंडियाने ७१ धावांनी विजय मिळवला. यानंतर वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा ३० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर अफगाणिस्ताननेही याच मैदानावर वेस्ट इंडिजचा ४१ आणि २९ धावांनी पराभव केला होता. तसेच भारताने ४ वर्षांपूर्वी श्रीलंकेचा ६२ धावांनी पराभव केला होता.

अर्थात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या विकेटवर अधिक मदत मिळते हे स्पष्ट आहे. जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी इथली विकेट मंदावते आणि फलंदाजांना त्रास होतो. अशा स्थितीत आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला येथे प्रथम फलंदाजी करायला आवडेल. मात्र, रात्रीच्या वेळी दुसऱ्या डावात दव गोलंदाजांना अडचणी निर्माण करू शकते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर कोणताही निर्णय घेणे कर्णधारासाठी सोपे असणार नाही.

लखनौमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा आहे?

भारतीय संघाने लखनौमध्ये दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत. हे दोन्ही भारताने सामने जिंकले आहेत. दोन्ही वेळा भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९०+ धावा केल्या आहेत. भारताने याआधी येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या