
T20 विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा उपांत्य सामना आज १० नोव्हेंबर (गुरुवार) रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध विजेतेपदासाठी लढेल. पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवून फायनलध्ये एन्ट्री केली आहे.
टीम इंडियाने हा सामना जिंकला तर २०१४ नंतर पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचेल. त्यावेळी भारताला फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याआधी २००७ मध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करुन जेतेपद मिळवले होते. तर इग्लंडचा २०१६ च्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजने पराभव केला होता.
या T20 विश्वचषकातील दोन्ही संघांच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा पराभव केला.
तर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. पण नंतर इंग्लंडने दमदार पुनरागगमन करत न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
भारत-इंग्लंड सेमी फायनल सामना कुठे होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.
सामना किती वाजता होणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल. तर नाणेफेक दुपारी १:०० वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?
या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात Disney+ Hotstar अॅपवर पाहता येईल.
फ्रीमध्ये सामना कसा पाहणार ?
हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जाणार आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा प्रकारे तुम्ही हा सामना कोणतेही पैसे न भरता पाहू शकता.
संबंधित बातम्या
