मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: जडेजाने रचला इतिहास, कपिल देव-धोनीच्या खास क्लबमध्ये स्थान

IND vs ENG: जडेजाने रचला इतिहास, कपिल देव-धोनीच्या खास क्लबमध्ये स्थान

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 02, 2022 05:22 PM IST

आजच्या शतकानंतर रविंद्र जडेजा हा महान क्रिकेटपटू कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला आहे. जडेजाने याच वर्षी मार्चमध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती.

jadeja and dhoni
jadeja and dhoni

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना एजबॅस्टनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने इतिहास रचला आहे. जडेजाने पहिल्या डावात १९४ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर तो कपिल देव आणि एमएस धोनीच्या विशेष यादीत सामील झाला आहे.

कपिल देव, धोनीच्या क्लबमध्ये जड्डूचा समावेश-

एका कॅलेंडर वर्षात सातव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाने २ शतके झळकावली आहेत. या शतकानंतर तो महान क्रिकेटपटू कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या स्पेशल क्लबमध्ये सामील झाला आहे. रविंद्र जडेजाने याच वर्षी मार्चमध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती.

कपिल देव: १९८६

एमएस धोनी: २००९

हरभजन सिंग: २०१०

रवींद्र जडेजा: २०२२

एजबॅस्टनच्या मैदानावर शतक झळकावणारा जडेजा चौथा भारतीय

एजबॅस्टन येथे शतक झळकावणारा रवींद्र जडेजा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी याच सामन्यात रिषभ पंतने शतक ठोकले आहे. या दोघांच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी एजबॅस्टन येथे कसोटी शतके झळकावली आहेत. जडेजाने १८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १३ चौकार मारले. पहिल्या दिवशी रिषभ पंतने ८९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

रवींद्र जडेजाचे हे कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. जडेजा हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावावर आता ३६.७६ च्या सरासरीने २५०० धावा जमा झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने १७५ धावांची शानदार खेळी केली होती.

भारताच्या पहिल्या डावाक ४१६ धावा-

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर आटोपला आहे. भारताकडून रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांंनी शतके ठोकली आहेत. दोघांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी २२२ धावांची भागिदारी रचली. भारतीय संघ अडचणीत असताना दोघांनी जबाबदारीने खेळ केला. पंतने १४६ धावा तर जडेजाने १०४ धावा केल्या. शेवटी जसप्रीत बुमराने १६ चेंडूत ३१ धावा चोपल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले. 

WhatsApp channel