मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: कसोटी सामन्याच्या वेळेत बदल, भारतीयांसाठी ECB चा मोठा निर्णय
team india
team india
26 June 2022, 19:15 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 19:15 IST
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ईसीबीने (ECB)  भारतीय प्रेक्षकांसाठी सामना वेळेच्या ३० मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

टीम इंडिया सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला (team india) एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना हा १ जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, या सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारतीय प्रेक्षकांसाठी सामना वेळेच्या ३० मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. साधारणपणे इंग्लंडमध्ये सकाळी ११ वाजता सामना सुरू होतो, मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजल्यापासून या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

भारतीय प्रेक्षकांसाठी दिवसाचा पहिला चेंडू दुपारी ३ वाजता फेकला जाईल. तर रात्री १० वाजेपर्यंत खेळ सुरु राहिल. तसेच, दिवसातील ९० षटके पूर्ण न झाल्यास ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देखील असेल.

मात्र, टी-२० आणि एकदिवसीय मालिकेच्या वेळेत बदल झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता खेळवले जाणार आहेत. तर एक सामना सायंकाळी ५:३० वाजता सुरु होईल. तसेच, तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन एकदिवसीय सामने हे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता सुरू होतील. तर एक वनडे सामना दुपारी ३:३० वाजता सुरु होणार आहे.

इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक-

कसोटी मालिका

५ वा कसोटी सामना: एजबॅस्टन- १-५ जुलै (दुपारी ३ वाजेपासून)

टी-२० मालिका

पहिला टी-२०: ७ जुलै (एजेस बाउल) (रात्री ११ वाजता)

दुसरा टी-२०: ९ जुलै (एजबॅस्टन) (सायंकाळी ७ वाजता)

तिसरा टी-२०: १० जुलै ( ट्रेंट ब्रिज) (रात्री ११ वाजता)

एकदिवसीय मालिका

पहिला वन-डे: १२ जुलै (ओव्हल) (दुपारी ५:३० वाजेपासून)

दुसरा वन-डे: १४ जुलै (लॉर्ड्स) (दुपारी ५:३० वाजेपासून)

तिसरा वन-डे: १७ जुलै (मँचेस्टर) (दुपारी ३:३० वाजेपासून)