IND vs ENG 2nd Semi Final: इंग्लंडला हरवणं भारतासाठी कठीण नाही, ही आकडेवारी पाहा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG 2nd Semi Final: इंग्लंडला हरवणं भारतासाठी कठीण नाही, ही आकडेवारी पाहा

IND vs ENG 2nd Semi Final: इंग्लंडला हरवणं भारतासाठी कठीण नाही, ही आकडेवारी पाहा

Updated Nov 10, 2022 12:06 PM IST

India vs England 2nd Semi Final Match: वनडे आणि टी-२० क्रिकेटमधील भारत आणि इंग्लंड यांच्यीतील आकडेवारी पाहिली तर टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ असल्याचे पाहायला मिळते. पण टेस्टमध्ये इंग्लंडची कामगिरी भारतापेक्षा चांगली आहे.

IND vs ENG 2nd Semi Final
IND vs ENG 2nd Semi Final

india vs england head to head stats: T20 विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा उपांत्य सामना आज १० नोव्हेंबर (गुरुवार) रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध विजेतेपदासाठी लढेल. पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवून फायनलध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे दुसऱ्या सेमी फानयलमध्ये भारतीय संघ विजयी व्हावा आणि फायनलमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान थरार पाहायला मिळावा, अशी प्रार्थना भारतीय तसेच पाकिस्तानी चाहतेही करत आहेत.

दरम्यान, वनडे आणि टी-२० क्रिकेटमधील भारत आणि इंग्लंड यांच्यीतील आकडेवारी पाहिली तर टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ असल्याचे पाहायला मिळते. पण टेस्टमध्ये इंग्लंडची कामगिरी भारतापेक्षा चांगली आहे.

टी-20 वनडेत भारत इंग्लंडवर भारी

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत २२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाचे पारडे जड आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध १२ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे इंग्लिश संघाने भारतीय संघाविरुद्ध १० सामने जिंकले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १०६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. येथेही इंग्लिश संघाविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध ५७ वनडे सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लिश संघाने भारतीय संघाविरुद्ध ४४ वनडे सामने जिंकले आहेत. याशिवाय ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर दोन सामने टाय झाले आहेत.

टेस्टमध्ये इंग्लंड वरचढ

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. येथे भारतीय संघाविरुद्ध इंग्लिश संघाचा वरचष्मा आहे. जिथे इंग्लंडने भारताविरुद्ध ५० सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध केवळ ३१ सामने जिंकले आहेत. तर ५० सामने अनिर्णित राहिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या