मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG : भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी; भारताचा इंग्लंडवर सात विकेट्सनं विजय

IND vs ENG : भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी; भारताचा इंग्लंडवर सात विकेट्सनं विजय

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 19, 2022 12:12 AM IST

IND vs ENG 1st ODI Women Cricket : भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. मराठमोळी स्मृती मंधाना हिने तब्बल ९१ रन काढून चांगली कामगिरी केली.

भारतीय महिला संघाचा इंग्लंडच्या संघावर विजय
भारतीय महिला संघाचा इंग्लंडच्या संघावर विजय

भारत आणि इंग्लंड महिला संघाचा पहिला एकदिवासीय सामना आज पार पडला. यात भारताने नाणेफेक जिंकत लोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली, भारतीय संघानं हे लक्ष तीन गड्यांच्या मोबदल्यात ४४.२ षटकात पार करत विजय मिळवला. या मालिकेत भारतीय संघाने १ ने आघाडी घेतली आहे.

हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २२७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून डॅनिअल वॅट (४३ ), अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (नाबाद ५०) आणि सोफी एक्लेस्टोन (३१) यांच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघाने २२७ एवढी मोठी धावसंख्या उभारली. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय झुलन गोस्वामीने १० षटकात फक्त २० धावा दिल्या.

या बदल्यात इंग्लंड महिला संघाने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा अवघी १ धाव काढून बाद झाली होती. पण त्यानंतर स्मृती मंधानाने झंझावाती ९१ धावांची खेळी केली. यासिका भाटिया (५०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (७४) धावा काढल्या. विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर स्मृती मंधाना ९१ धावांवर बाद झाली. तिचे शतक थोडक्यात हुकले.

भारतीय संघ

स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देवोल, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह.

इंग्लंडचा संघ

एम्मा लॅम्ब, टॅमी ब्यूमॉन्ट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, डॅनियल व्याट, एमी जोन्स, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, केट क्रॉस, इस्सी वोंग

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग