मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: रोहित-शिखर जोडीला ६ धावांची गरज, दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होणार
rohit and dhawan
rohit and dhawan

IND vs ENG: रोहित-शिखर जोडीला ६ धावांची गरज, दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होणार

12 July 2022, 18:30 ISTRohit Bibhishan Jetnavare

रोहितसोबत धवन या दोघांच्या नावावर सलामीवीर म्हणून अनेक विक्रम आहेत. अशा परिस्थितीत या दोघांना आणखी एक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना खास विक्रम करण्याची संधी असेल. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित-धवनची सलामी जोडी कोणत्याही गोलंदाजांची धुलाई करण्यास सक्षम आहे. या दोघांच्या नावावर सलामीवीर म्हणून अनेक विक्रम आहेत. अशा परिस्थितीत या दोघांना आणखी एक विक्रम आपल्या नावावर करायची संधी आहे. धवन आणि रोहित यांनी सलामीवीर म्हणून १११ डावात एकत्र फलंदाजी केली आहे. यामध्ये दोघांनी ४९९४ धावा जोडल्या आहेत.

<p>रोहित आणि शिखर</p>
रोहित आणि शिखर

आता दोघांनी ६ धावांची भागीदारी करताच ही जोडी एका खास क्लबमध्ये सामील होईल. सहा धावा केल्यानंतर ही जोडी वन-डेत ५ हजार धावांची भागीदारी पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारी ही जगातील चौथी सलामी जोडी असेल. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन आणि वेस्ट इंडिजचा गॉर्डन ग्रीनिज-डेसमंड हेन्स यांनी असे केले आहे.

सचिन आणि गांगुली या जोडीने सलामीवीर म्हणून १३६ डावांमध्ये सर्वाधिक ६ हजार ६०९ धावांची भागीदारी केली आहे. त्याचबरोबर गिलख्रिस्ट आणि हेडन यांनी ११४ डावांमध्ये (ओपनिंग) ५ हजार ३७२ धावांची भागीदारी केली आहे. तर सलामीवीर म्हणून ५,१५० धावा जोडण्याचा विक्रम ग्रीनीज आणि हेन्स यांच्या नावावर आहे. रोहित-धवनला भारताची दुसरी सर्वात यशस्वी जोडी बनण्याची संधी आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये या दोघांमध्ये ४९९४ धावांची भागीदारी झाली आहे.

<p>सचिन आणि गांगुली</p>
सचिन आणि गांगुली

रोहित-धवन या दोघांनी डावाची सुरुवात करताना १७ वेळेस शतकी भागीदारी तर १५ वेळेस अर्धशतकीय भागीदारी केली आहे.

सोबतच, इंग्लंडच्या पहिल्या वनडेमध्ये शिखर धवन मैदानात उतरताच तो कारकिर्दितले १५० वनडे सामने पूर्ण करेल. या दौऱ्यानंतर धवनला वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे. विंडीजविरुद्धच्या वनडेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

<p>हेडन-गिलख्रिस्ट</p>
हेडन-गिलख्रिस्ट