IND vs BAN T20: बांगलादेशविरुद्ध ऋषभ पंतची एन्ट्री निश्चित? दिनेश कार्तिक संघाबाहेर
Dinesh Karthik Injury- IND vs BAN T20 World Cup: T20 विश्वचषकात दिनेश कार्तिकने त्याच्या यष्टीरक्षणाने खूप प्रभावित केले आहे, परंतु तो बॅटने फार काही करू शकला नाही. दिनेश कार्तिकला आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.
IND vs BAN T20 World Cup: टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त झाला आहे. तो पाठदुखीने त्रस्त असून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान कार्तिकला ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अर्ध्या सामन्यातून मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यानंतर ऋषभ पंतने सामन्यातील विकेटकीपरची जबाबदारी पार पाडली.
ट्रेंडिंग न्यूज
दरम्यान आता कार्तिक बाहेर पडल्यानंतर कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण के एल राहुलही विकेटकीपिंग करु शकतो, पण मॅनेजमेंट पंतला संधी देऊ शकते.
विशेष म्हणजे कार्तिकची दुखापत किती गंभीर आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु अशी दुखापत बरी होण्यासाठी साधारणपणे ३ ते ५ दिवस लागतात. कार्तिकची दुखापत गंभीर असेल तर भारताच्या अडचणी वाढू शकतात.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कार्तिकला पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवत आहे. त्याच्या पाठीच्या दुखण्याची तीव्रता आम्हाला माहीत नाही. त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक काम करत आहे. हीट आणि मसाजमुळे वेदना लवकर कमी करता येऊ शकतात. त्यामुळे त्याला सामन्यातून बाहेर मानले जाऊ नये."
कार्तिकची या स्पर्धेत आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध १ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ चेंडूत ६ काढल्या होत्या. सूर्यकुमारसोबत ५२ धावांची भागीदारी करताना त्याने अतिशय संथ फलंदाजी केली त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.