मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023 : टेस्ट चॅम्पियनशीप फायनल अनिर्णित राहिल्यास चॅम्पियन कोण होणार? काय आहेत नियम? पाहा

WTC Final 2023 : टेस्ट चॅम्पियनशीप फायनल अनिर्णित राहिल्यास चॅम्पियन कोण होणार? काय आहेत नियम? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 03, 2023 12:10 PM IST

if wtc final draw who will win : भारत-ऑस्ट्रेलिया संघ WTC Final साठी आवश्यक तयारी करत आहे. लंडनमधील ओव्हल येथे ७ ते ११ जून दरम्यान रंगणारा हा सामना (WTC Final if Draw or washed out) भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

IND Vs AUS WTC Final
IND Vs AUS WTC Final

IND Vs AUS WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून रंगणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. WTC Final जिंकून भारतीय संघ पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, तसे पाहता इंग्लिश कंडिशन्समध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणे टीम इंडियासाठी सोपे असणार नाही.

यासाठीच भारतीय संघ सध्या ब्रिटनमध्ये असून या महत्त्वाच्या सामन्यासाठीच जोरदार तयारी करत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघही WTC Final साठी आवश्यक तयारी करत आहे. लंडनमधील ओव्हल येथे ७ ते ११ जून दरम्यान रंगणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

सामन्यादरम्यान हवामानाचा अंदाज

Accuweather च्या अहवालानुसार, सामन्याच्या पहिल्या (wtc final weather forecast) ४ दिवशी हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. मात्र, सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची ५६ टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत सामन्याच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की, कसोटीच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला तर? आयसीसीने यासाठी राखीव दिवस ठेवला आहे का? सामना अनिर्णित राहिला तर कोणता संघ चॅम्पियन होईल?

पाऊस पडला तर?

पावसामुळे एक किंवा दोन तासांचा खेळ वाया गेल्यास पंच त्याच दिवशी त्याची भरपाई करू शकतात. त्याचवेळी, पावसामुळे दिवसभराचा खेळ वाया गेला तर पंचांकडे अतिरिक्त दिवस असेल. पंच सामना राखीव दिवसापर्यंत नेऊ शकतात.

सामना अनिर्णित राहिला तर?

सामना टाय किंवा ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.

WTC Final साठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.

राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

WhatsApp channel