मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS Weather Report : पावसामुळे दुसरा वनडे रद्द होणार? रविवारी असं असेल विशाखापट्टणमचं हवामान
IND vs AUS Weather Report
IND vs AUS Weather Report

IND vs AUS Weather Report : पावसामुळे दुसरा वनडे रद्द होणार? रविवारी असं असेल विशाखापट्टणमचं हवामान

18 March 2023, 13:39 ISTRohit Bibhishan Jetnavare

India vs Australia 2nd ODI Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो.

India vs Australia Visakhapatnam 2nd ODI Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला गेला. त्या सामन्यात भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१९ मार्च) विशाखापट्टणम येथील वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता आहे. पावसामुळे या सामन्यात अडथळा येऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

विशाखापट्टणमचे हवामान असे असेल? (ins vs aus 2nd ODI Weather Forecast)

विशाखापट्टणममध्ये १९ मार्चला सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना विस्कळीत होऊ शकतो. पावसासोबतच वादळाचाही अंदाज आहे. सामन्याच्या दिवशी विशाखापट्टणममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी ३१ ते ५१ टक्के पावसाचा अंदाज आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहील. दिवसाव्यतिरिक्त सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत खेळ मधेच थांबवला जावू शकतो अथवा सामन्याची षटके कमी होऊ शकतात.

विशेष म्हणजे या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होणार आहे. पहिल्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली होती. आता रोहित शर्मा उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाचा भाग असेल. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५ विकेट्सने विजय मिळवला होता.

वनडे मालिकेसाठी भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ

भारत -

रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया-

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडमडा .