मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: अगदी तसंच झालं! कॉमेंटेटर इयान बिशपचं विराटबाबतचं भाकीत खरं ठरंल..पाहा
Virat Kohli
Virat Kohli

Virat Kohli: अगदी तसंच झालं! कॉमेंटेटर इयान बिशपचं विराटबाबतचं भाकीत खरं ठरंल..पाहा

21 September 2022, 11:07 ISTRohit Bibhishan Jetnavare

Ian Bishop on Virat Kohli ind vs aus 1st t20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना मोहालीत खेळला गेला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीची एक रिअॅक्शन व्हायरल झाली होती.  या रिअॅक्शवर नक्कीच मीम्स बनणार, असे ट्वीट कॉमेंटेटर इयान बिशपने केले होते. त्याचे हे भाकीत खरे ठरले आहे.

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या १-० अशी आघाडी घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०९ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. डावातील दुसऱ्याच षटका त कॅमरुन ग्रीनने उमेश यादवला सलग चार चौकार मारले. यावेळी ग्रीनने मारलेला दुसऱ्या चेंडूवरील चौकार पाहून विराट कोहलीही अवाक् झाला. त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्यचकित करणारे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले.

विराटच्या फोटोवर मीम्स बनणार- इयान बिशप

विराटचे ही रिअॅक्शन पाहून कॉमेंटेटर इयान बिशपनेही एक ट्वीट केले आहे. “विराटच्या या रिअॅक्शनवर नक्कीच मीम्स बनतील,” असे ट्वीट बिशपने केले आहे. विशेष म्हणजे सामन्यानंतर झालेही अगदी तसेच, विराटच्या त्या फोटोवर प्रचंड मीम्स बनत आहेत.

सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणही खूप खराब होते. क्षेत्ररक्षकांनी अनेक झेल सोडले. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आपल्या सहकारी खेळाडूंवरही प्रचंड रागावलेला दिसला.

रोहितनं कार्तिकचा गळा पकडला

विशेष म्हणजे, उमेश यादवच्या एकाच षटकात दोन फलंदाज विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद झाले. मात्र, या दोन्ही फलंदाजांच्या विरोधात कॅप्टन रोहित शर्माला रिव्ह्यू घ्यावे लागले. कारण कार्तिक आणि अंपायर या दोघांना चेंडू बॅटला लागल्याचा आवाज आला नाही. दोन्ही रिव्ह्यू यशस्वी ठरल्यानंतर रोहितने मजाकमध्ये कार्तिकचा गळा पकडला.

 

मात्र, रोहित आणि कार्तिकच्या या मजेशीर प्रसंगावरही विराट कोहलीच्या त्या रिअॅक्शनवाल्या फोटोचा संबंध जोडून मीम्स बनत आहेत.