मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS 2nd ODI Highlights : दुसऱ्या वनडेत भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका १-१ बरोबरीत

IND vs AUS 2nd ODI Highlights : दुसऱ्या वनडेत भारताचा लाजिरवाणा पराभव, मालिका १-१ बरोबरीत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 19, 2023 12:51 PM IST

IND vs AUS 2nd ODI score : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना २२ मार्च रोजी चेन्नईत होणार आहे.

IND vs AUS 2nd ODI Live score
IND vs AUS 2nd ODI Live score

Live Cricket Score, India vs Australia (IND vs AUS) 2nd ODI : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणममधील या विजयासह कांगारू संघाने मालिकेत पुनरागमन केले आहे. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना २२ मार्च रोजी चेन्नईत होणार आहे.

IND vs AUS 2nd ODI score updates :

ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईतील पहिली वनडे भारताने जिंकली. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. हा सामना एक प्रकारे फायनल असेल. तिसरा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ११ षटकांत १२१ धावा करत सामना जिंकला. मिचेल मार्शने ३६ चेंडूत ६६ आणि ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले. हेडने १० चौकार मारले.

भारताचा डाव

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्ये (प्रारंभिक १० षटके) पॅव्हेलियनमध्ये परतला. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. ११ पैकी फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद २९ धावा करत संघाला १०० धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने १६ आणि रोहित शर्माने १३ धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले.

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने ५ आणि शॉन अॅबॉटने ३ बळी घेतले. नॅथन एलिसला दोन बळी मिळाले.

IND vs AUS 2nd ODI Live Score : मिचेल मार्शचे धडाकेबाज अर्धशतक 

मिचेल मार्शने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो २९ चेंडूत ५४ धावांवर खेळत आहे.

IND vs AUS 2nd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाच्या ६ षटकात 67 धावा 

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. दोघांनी अवघ्या 32 चेंडूत संघाच्या 50 धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाने सहा षटकात बिनबाद 66 धावा केल्या आहेत. मार्श आणि हेड यांनी 31-31 धावा केल्या आहेत. दोघांनी 18-18 चेंडूंचा सामना केला आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 षटकात केवळ 52 धावा करायच्या आहेत.

IND vs AUS 2nd ODI Live Score : भारताचा संघ ११७ धावांत गारद

भारताने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. १९८१ मध्ये भारतीय संघ सिडनीमध्ये ६३ धावा तर २००० साली सिडनीतच १०० धावांत गारद झाला होता

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी टीम इंडियाने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वडोदरा येथे १४८ धावा केल्या होत्या. 

दुसरीकडे, लक्ष्याच्या बचावाबद्दल बोलायचे तर, भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी १०५ धावांचा बचाव केला आहे. भारताने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्याच वेळी, १९८५ मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध १२५ धावांचा बचाव केला होता. यानंतर २००६ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध १६२ धावांचा बचाव केला होता.

भारताचा डाव

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची आघाडीची फळी या सामन्यातही अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारतीय संघाने ३९ धावांत चार विकेट्स आणि नंतर ८३ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण ४९ धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या. स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा आऊट झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला.

यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला १५ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव एलबीडब्ल्यू आऊट झाला. तो याआधीच्या सामन्यात जसा आऊट झाला होता तसाच यावेळीही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या वनडेत खाते उघडता आले नाही.

यानंतर केएल राहुल मिशेल स्टार्कचा पुढचा बळी ठरला. राहुलला १२ चेंडूत ९ धावा करता आल्या. स्टार्कने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हार्दिकला एक धाव काढता आली. 

 भारताला १६व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली ३५ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

यानंतर ९१ धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला ३९ चेंडूत १६ धावा करता आल्या. १०३ धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला १७ चेंडूत चार धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव ११७ धावांत गुंडाळला.

भारताचे एकूण सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. यातील चार फलंदाज शून्यावर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कशिवाय अॅबॉटने तीन आणि नॅथन एलिसने दोन गडी बाद केले.

IND vs AUS 2nd ODI Live Score : ९ फलंदाज तंबूत

२५व्या षटकात १०३ धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला १७ चेंडूत चार धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. सध्या अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत. भारताची धावसंख्या २५ षटकांनंतर ९ बाद १०३ अशी आहे.

IND vs AUS 2nd ODI Live Score : भारत १३ षटकांनंतर ६५/५

१३ षटकांनंतर भारताने पाच गडी गमावून ६५ धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली २८ धावा करून क्रीजवर आहे तर रवींद्र जडेजा आठ धावांवर खेळत आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय टॉप ऑर्डर अपयशी ठरली. गेल्या सामन्यात भारताने ३९ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाला ४९ धावांवर पाच धक्के बसले होते. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा १३ धावा, केएल राहुल ९ धावा आणि हार्दिक पंड्या एक धावा काढून बाद झाला. मिचेल स्टार्कने चार, तर शॉन अॅबॉटला एक विकेट मिळाली.

IND vs AUS 2nd ODI Live score : हार्दिकही पॅव्हेलियनमध्ये परतला

राहुल बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात शॉन अॅबॉटने भारताला आणखी एक धक्का दिला. १०व्या षटकात अॅबॉटने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हार्दिकला एक धाव काढता आली. १० षटकांनंतर भारताची धावसंख्या ५ बाद ५१ अशी आहे. सध्या रवींद्र जडेजा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

IND vs AUS 2nd ODI Live score : स्टार्कने एकाच षटकात दोन धक्के दिले

पाचव्या षटकातच मिचेल स्टार्कने रोहित शर्माला परतीचा रस्ता दाखवला. भारतीय कर्णधार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये त्याचा झेल घेतला. रोहितने १५ चेंडूत १३ धावा केल्या. स्टार्कने भारतीय सलामी जोडीला माघारी पाठवले

रोहितनंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने सूर्यकुमारलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ओव्हरचा पाचवा चेंडू सूर्याच्या पुढच्या पॅडला लागला आणि अंपायरने एलबीडब्ल्यू दिला. सूर्यकुमार रिव्ह्यू न घेता गोल्डन डकवर परतला. स्टार्कचे हे षटक दोन विकेट आणि मेडन ठरले.

IND vs AUS 2nd ODI Live Score : भारताला पहिला धक्का

पहिल्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. डावाच्या तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिल बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने लबुशेनच्या हाती झेलबाद केले. शुभमनला खातेही उघडता आले नाही. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ८ धावा आहे. सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

IND vs AUS 2nd ODI Live : दोन्ही संघ

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

IND vs AUS 2nd ODI Live : भारताची प्रथम फलंदाजी 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि जोस इंग्लिस यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी अॅलेक्स कॅरी आणि नॅथन एलिसचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. रोहित आणि अक्षर पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

IND vs AUS 2nd ODI Live : विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज

Accuweather नुसार हवेची गुणवत्ता चांगली असेल. सामन्यादरम्यान आर्द्रता ८१ टक्के आणि दवबिंदू ((Dew Point)) २१ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तसेच, सामन्यादरम्यान ७६ टक्के ढगांचे आवरण (क्वाउड कव्हर) अपेक्षित आहे. विशाखापट्टणममध्ये आज सकाळीही जोरदार पाऊस झाला. या क्षणाचे ताजे अपडेट म्हणजे पाऊस थांबला आहे आणि आकाशही निरभ्र झाले आहे. खेळ वेळेवर सुरू होईल अशी आशा आहे.

IND vs AUS 2nd ODI Live : ऑस्ट्रेलिया संघात बदल होऊ शकतात

कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी चिंतेची बाब म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी. मिचेल मार्शची शानदार सुरुवात मधल्या फळीतील आणि खालच्या फळीतील फलंदाजांना टिकवता आली नाही. दुसऱ्या वनडेत स्टीव्ह स्मिथला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

IND vs AUS 2nd ODI Live : भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर असेल नजर

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-११ वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू बाहेर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांपैकी एकाला दुसऱ्या वनडेतून डच्चू मिळू शकतो. अशात सूर्या बाहेर बसण्याची शक्यता जास्त आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होत आहे. तसेच, इशान किशन मधल्या फळीत फलंदाजी करण्यात माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.

दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य संघ

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया

डेव्हिड वॉर्नर / ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

WhatsApp channel