मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS 3rd ODI Highlights : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली, निर्णायक सामन्यात भारताचा पराभव

IND vs AUS 3rd ODI Highlights : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली, निर्णायक सामन्यात भारताचा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2023 01:08 PM IST

IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला.

IND vs AUS 3rd ODI Live
IND vs AUS 3rd ODI Live

Cricket Score, India vs Australia (IND vs AUS) 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला.

IND vs AUS 3rd ODI Score Update 

ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला.

२७० धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला, पण अखेरीस भारताने लागोपाठ विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ २४८ धावांवर गारद झाला.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची नववी विकेट पडली

२४३ धावांच्या स्कोअरवर भारताची नववी विकेट पडली. मोहम्मद शमी १० चेंडूत १४ धावा करून बाद झाला आहे. मार्कस स्टॉइनिसने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत. शमीने एक चौकार आणि एका षटकाराने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण या धावा सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. भारताची धावसंख्या ४८ षटकांनंतर ९ बाद २३५ अशी आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची आठवी विकेट पडली

२२५ धावांच्या स्कोअरवर भारताची आठवी विकेट पडली. अॅडम झाम्पाने रवींद्र जडेजाला १८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने ३३ चेंडूत १८ धावा केल्या. आता कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी क्रीजवर आहेत. भारताच्या विजयाच्या आशा जवळपास संपल्या आहेत.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची सातवी विकेट पडली

२१८ धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. हार्दिक पांड्या ४० चेंडूत ४० धावा करून बाद झाला आहे. अॅडम झाम्पाने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. आता रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत. 

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची सहावी विकेट पडली

या सामन्यातही सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो शुन्यावर बाद झाला. अॅश्टन एगरने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने सलग दोन चेंडूंत विकेट घेत भारतीय संघाला बॅकफूटवर आणले आहे. आता भारताला हा सामना जिंकणे कठीण होणार आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताचा निम्मा संघ तंबूत

भारताचा निम्मा संघ १८५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. विराट कोहलीच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. कोहलीने ७२ चेंडूत ५४ धावा केल्या. अॅश्टन अगरने त्याला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले.

IND vs AUS 3rd ODI Live Score : विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याने ६१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. कोहलीने आतापर्यंतच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे. भारताला विजयासाठी १९ षटकात ११० धावांची गरज आहे. कोहलीसोबत हार्दिक पांड्या क्रीजवर आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची तिसरी विकेट पडली

१४६ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. लोकेश राहुल ५० चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. अॅडम झाम्पाने त्याला शॉन अॅबॉटच्या हाती झेलबाद केले. राहुल आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. आता अक्षर पटेल कोहलीसोबत क्रीजवर आहे. २८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १४७ आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताच्या १०० धावा

भारताने दोन विकेट गमावून १०० धावा पूर्ण केल्या आहेत. भारताने दोन गडी लवकर गमावले होते, पण विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय डाव सांभाळला आहे, भारताची धावसंख्या १८ षटकांनंतर २ बाद १०४ आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची दुसरी विकेट पडली

७७ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल ४९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. अॅडम झाम्पाने पायचीत केले.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची पहिली विकेट पडली

६५ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा १७ चेंडूत ३० धावा करून बाद झाला आहे. शॉन अॅबॉटने त्याला मिचेल स्टार्ककरवी झेलबाद केले. आता विराट कोहली शुभमन गिलसोबत क्रीजवर आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : रोहित-शुभमनची अर्धशतकीय भागीदारी

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. भारताने आठ षटकांत बिनबाद ५५ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ३१ आणि रोहित शर्मा २२ धावा करून खेळत आहेत.

IND vs AUS 3rd ODI Live Score : भारताची सुरळीत सुरुवात

२७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ही जोडी क्रीझवर आहे. दोघेही ते सावधपणे खेळत आहेत. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद १८ अशी आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाच्या २६९ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मोहम्मद सिराजने स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. स्टार्कने १० धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४९ षटकांत २६९ धावांवर आटोपला.

चेन्नईतील खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी सोपी नाही, त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करणे भारतासाठी फारसे सोपे नसेल. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६१ धावांची भर घातली. मात्र, हेड ३३ धावा करून हार्दिकचा बळी ठरला. यानंतर हार्दिकने स्टीव्ह स्मिथला खातेही उघडू दिले नाही आणि मार्शला ४७ धावांवर बाद केले. १७ धावांच्या अंतरावर तीन विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला.

यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली, मात्र कुलदीप यादवने दोघांनाही बाद करून सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली, मात्र अक्षरने २५ धावांवर स्टॉइनिसला झेलबाद केले. यानंतर कुलदीपने शानदार चेंडूवर कॅरीला बाद केले. कॅरीने ३८ धावा केल्या.

अॅबॉटने २६ , अगर १७ आणि स्टार्क-जम्पाने १०-१० धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६९ धावांपर्यंत नेली. भारताकडून हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी तीन, तर अक्षर पटेल आणि सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अनेक फलंदाजांना चांगली सुरुवात झाली, मात्र कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. बहुतांश फलंदाजांनी खराब फटके खेळून विकेट गमावल्या. स्टीव्ह स्मिथ वगळता प्रत्येक ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला, पण अर्धशतकही झळकावता आले नाही. दोन फलंदाजांनी ३० पेक्षा जास्त धावा केल्या, तर चार फलंदाजांनी २०-३० च्या दरम्यान धावा केल्या. यापैकी कोणत्याही फलंदाजाने मोठी खेळी केली असती तर कांगारू संघाला ३०० च्या जवळपास धावा करता आल्या असत्या.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली

२४५ धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली. अक्षर पटेलने शॉन अॅबॉटला बाद करून भारताला आठवे यश मिळवून दिले. अॅबॉटने २३ चेंडूत २६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४५ षटकांत ८ बाद २४५ अशी आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : एगर आणि अॅबॉट यांच्यात भागीदारी

एश्टन एगर आणि शॉन अॅबॉट यांनी आठव्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी केली. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत आहेत. ४४ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात २३१ अशी आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : स्टॉइनिस बाद

मार्कस स्टॉइनिसला अक्षर पटेलने बाद केले. २६ चेंडूत २५ धावा करून तो बाद झाला. अक्षर पटेलच्या चेंडूवर शुभमन गिलने त्याचा झेल घेतला. स्टॉइनिसने अॅलेक्स कॅरीसोबत सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट्सवर १९६ धावा आहेत.

IND vs AUS 3rd ODI Live Score : स्टॉइनिस-कॅरी यांनी डाव सांभाळला

मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स केरी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आहे. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७० धावांच्या पुढे गेली आहे. आता हे दोघे मोठी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ३०० धावांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील. 

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट पडल्या

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १३८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मार्नस लबुशेनला बाद करून कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. लबुशेनने ४५ चेंडूत २८ धावा केल्या. शुभमन गिलने त्याचा झेल टिपला. 

IND vs AUS 3rd ODI Live Score : २० षटकांनंतर ऑस्ट्रेलिया १०१/३ 

ऑस्ट्रेलियाच्या डावातील २० षटके संपली आहेत. त्यांनी तीन गडी बाद १०६ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर १६ धावांवर खेळत आहे तर मार्नस लॅबुशेन आठ धावांवर आहे. २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला जीवदान मिळाले. जडेजाच्या चेंडूवर मोहम्मद सिराजला त्याचा झेल घेता आला नाही.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का 

हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. १५व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने मिचेल मार्शला क्लीन बोल्ड केले. मार्शने ४७ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. मार्श बाद झाल्यानंतर मार्निश लबुशेन क्रीजवर आला आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला

हार्दिक पांड्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ११व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बाद केले. ३१ चेंडूत ३३ धावा करून हेड झेलबाद झाला. त्याने मिचेल मार्शसोबत पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. 

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलिया १० षटकांनंतर ६१/०

ऑस्ट्रेलियाच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्यांनी १० षटकात बिनबाद ६१ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श ३३ चेंडूत नाबाद ३३ आणि ट्रॅव्हिस हेड २७ चेंडूत २७ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ पहिल्या विकेटची वाट पाहत आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पाच षटकांत बिनबाद ३९ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श १६ चेंडूत २७ आणि ट्रॅव्हिस हेड १४ चेंडूत ११ धावांवर खेळत आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु आहे

 ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाली आहे. मिचेल मार्श ट्रॅव्हिस हेडसह क्रीजवर आले आहेत. डेव्हिड वॉर्नरला सलामीला पाठवण्यात आलेले नाही. मोहम्मद शमीने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

IND vs AUS 3rd ODI Live Score : दोन्ही संघ 

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): 

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

IND vs AUS 3rd ODI Live : भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या नव्या खेळपट्टीवर टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात एकही बदल केला नाही. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघात परतला आहे. तो अनफिट कॅमेरून ग्रीनच्या जागी खेळेल.

WhatsApp channel