India vs Australia: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार गेला. मात्र, आता तीन दिवसानंतर भारत आणि ऑस्टेलिया पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारत मायदेशात ऑस्ट्रेलियाशी पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. दरम्यान, या मालिकेतील वेळापत्रकावर एक नजर टाकुयात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. कारण, या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करू शकते.
पहिला सामना- २३ नोव्हेंबर २०२३ (राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम)
दुसरा सामना- २६ नोव्हेंबर २०२३ (ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम)
तिसरा सामना- २८ नोव्हेंबर २०२३ (बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी)
चौथा सामना- ०१ डिसेंबर २०२३ (विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर)
पाचवा सामना- ०३ डिसेंबर २०२३ (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद)
मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.
सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, रायन पराग, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार.