IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज, कांगारूंसमोर मोठं आव्हान!
India vs Australia 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
IND vs AUS 2nd ODI Live Telecast: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाचे पाणी पाजून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या विजयात सलामीवीर केएल राहुलची भूमिका महत्त्वाची ठरली. मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आजचा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकायचा आहे, अन्यथा एकदिवसीय ट्रॉफीवरही भारताचे नाव कोरले जाईल.
ट्रेंडिंग न्यूज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमध्ये खेळला जाणार आहे. विशाखापट्ट्णम मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. भारताने या मैदानावर ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सुटला आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ २०१० मध्ये या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव केला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. सामन्याचे थेट प्रवाह डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर , मोहम्मद शामी, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलियन संघ: डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस सायनिस, जोस इंग्लिस, मिशेल मार्श, अॅश्टन अल्गर, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, शॉन अॅबॉट, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी.