IND vs AUS Highlights : केएल राहुल फॉर्मात परतला! टीम इंडियाला सामना जिंकून दिला
India vs Australia (IND vs AUS) 1st ODI Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 1st odi ) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य ३९.५ षटकांत पूर्ण केले.
India vs Australia (IND vs AUS) 1st ODI Highlights मुंबईतील वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकांत १८८ धावांवर गारद झाला. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली.
ट्रेंडिंग न्यूज
प्रत्युत्तरात भारताने ३९.५ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. केएल राहुल लयीत परतला आणि त्याने चांगली फलंदाजी करताना ९१ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाही ४५ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची नाबाद भागीदारी झाली.
या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील एकदिवसीय सामना रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर १६ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे.
८३ धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत
दरम्यान, १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली नाही, ज्यामध्ये टीमने ५5 धावांवर पहिला विकेट गमावला, तर १६ धावांवर विराटच्या रूपाने संघाला दुसरा मोठा धक्का बसला. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांच्यात छोटीशी भागीदारी नक्कीच पाहायला मिळाली पण गिल २० धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. ८३ धावांवर भारतीय संघाने ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियन डाव
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड ५ धावा करून सिराजचा बळी ठरला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. स्मिथला हार्दिक पांड्याने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. त्याला २२ धावा करता आल्या. यानंतर मार्शने लबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. मार्शला जडेजाने सिराजच्या हाती झेलबाद केले. तो ६५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची धडाकेबाज खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मार्श बाद होताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. लबुशेनला कुलदीपने जडेजाच्या हाती झेलबाद केले. त्याला १५ धावा करता आल्या. यानंतर मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. त्याने तीन षटकांत ३ विकेट घेतल्या. त्याने जोश इंग्लिश २६, कॅमेरून ग्रीनला १२ आणि मार्कस स्टॉइनिसला ५ धावांवर बाद केले.
त्यानंतर जडेजाने मॅक्सवेलला हार्दिककडे झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. त्याचवेळी सिराजने शॉन अॅबॉट आणि अॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांत गुंडाळला. शमी आणि सिराजने प्रत्येकी ३, तर जडेजाने २ विकेट घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या