मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind Vs Aus: अरे फिल्टर वाली दीदी... भारतीयांनी घेतली 'या' अभिनेत्रीची शाळा

Ind Vs Aus: अरे फिल्टर वाली दीदी... भारतीयांनी घेतली 'या' अभिनेत्रीची शाळा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2022 08:11 PM IST

haridk pandya-pakistani actress sehar shinwari: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ४ विकेट्सनी पराभव झाला. पराभवानंतर पांड्याने सकारात्मक ट्विट केले होते. यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचे फोटोही पोस्ट केले होते.

haridk pandya-sehar shinwari
haridk pandya-sehar shinwari

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा ४ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक ट्विट केले आहे. मात्र, या ट्वीटवर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने टीम इंडियाबाबत कमेंट केली आहे. सेहर शिनवारी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. यानंतर भारतीय चाहत्यांनी या अभिनेत्रीची चांगलीच शाळा घेतली.

भारतीय संघाच्या पराभवानंतर पांड्याने सकारात्मक ट्विट केले होते. यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचे फोटोही पोस्ट केले होते. पांड्याने लिहिले की, “आम्ही या पराभवातून शिकू. आम्ही सुधारणा करू. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार.”

या ट्वीटवर सेहर शिनवारीने लिहिले की, "कृपया २३ ऑक्टोबरला वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडूनही पराभूत व्हा, तुम्हाला यातूनही बरेच काही शिकायला मिळेल." अभिनेत्रीने यापूर्वीही ट्विटरवर भारताविरोधात अनेक पोस्ट केल्या आहेत.

सेहरच्या या ट्विटनंतर भारतीय चाहत्यांनी तिला ट्रोल केले. ट्विटर युजर्सनी विविध कमेंट्स केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यामध्ये हार्दिक पांड्याने नाबाद ७१ धावांची खेळी केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या