मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS AUS 3rd ODI : केएल राहुल मैदानाबाहेर का गेला? इशान किशन करतोय विकेटकीपिंग

IND VS AUS 3rd ODI : केएल राहुल मैदानाबाहेर का गेला? इशान किशन करतोय विकेटकीपिंग

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2023 04:51 PM IST

ishan kishan replaced kl rahul in the wicket keeping ,India vs Australia 3rd odi : भारतीय संघ चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळत आहे. या सामन्यात केएल राहुल सुरुवातीच्या षटकात भारतासाठी कीपिंग करत होता. पण नंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी ईशान किशन ही जबाबदारी सांभाळत आहे.

ishan kishan replaced kl rahul in the wicket keeping
ishan kishan replaced kl rahul in the wicket keeping (social media)

ishan kishan replaced kl rahul in the wicket keeping : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल मैदानाबाहेर गेला

पहिल्या वनडेचा हिरो केएल राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १६व्या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असणारा इशान किशन यष्टिरक्षक म्हणून काम पाहत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान आणि राहुल दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. पण विकेटकीपिंग राहुलनेच केले.

केएल राहुल मैदानाबाहेर का गेला हे बीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, चेन्नईमध्ये उष्णता खूप जास्त आहे. राहुलच्या मैदानातून बाहेर पडण्याचे हे कारण असू शकते.

नियम काय आहे?

बदली खेळाडू क्रिकेटमध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. मात्र, MCC च्या २४.१.२ नियमानुसार विकेटकीपिंग किंवा क्षेत्ररक्षण करू शकतो. यासाठी मैदानावरील पंचांची परवानगी घ्यावी लागते. सोबतच, कन्कशन सब्स्टीट्यूट नियामांतर्गत प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरील खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या