मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS T20I: दुसरा T20 सामना संकटात, नागपुरात जोरदार पावसाचा अंदाज

IND vs AUS T20I: दुसरा T20 सामना संकटात, नागपुरात जोरदार पावसाचा अंदाज

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 22, 2022 05:23 PM IST

IND vs AUS Nagpur T20I: खेळपट्टी पाहण्यासाठी ग्राउंड्समननी गुरुवारी दुपारी कव्हर्स हटवले होते. परंतु रिमझिम पावसामुळे ते पुन्हा लावले गेले. स्टेडियम शहरापासून २० किमी अंतरावर आहे. असे असूनही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच येथे आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.

ind vs aus
ind vs aus

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२३ सप्टेंबर) नागपुरात होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे संकट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यत आहे.

वास्तविक, नागपुरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. दोन्ही संघ बुधवारी नागपुरात पोहोचले आहेत. पावसामुळे खेळाडू हॉटेलमधून स्टेडियमकडे गेले नाहीत. गुरुवारी पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सरावदेखील करता आला नाही. शुक्रवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियमची क्षमता ४५ हजार प्रेक्षकांची असून सर्व तिकिटे विकली गेली आहेत. सामना न झाल्यास प्रेक्षकांना पैसे परत करावे लागतील.

खेळपट्टी पाहण्यासाठी ग्राउंड्समननी गुरुवारी दुपारी कव्हर्स हटवले होते. परंतु रिमझिम पावसामुळे ते पुन्हा लावले गेले. स्टेडियम शहरापासून २० किमी अंतरावर आहे. असे असूनही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच येथे आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे.

भारतासाठी 'करा किंवा मरो'चा सामना

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ४ विकेटने गमावला होता. टीम इंडियाला २०८ धावसंख्येचा बचावही करता आला नाही. आता या मालिकेतील पुढील सामना नागपुरात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना 'करा किंवा मरो'चा असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा प्रयत्न या सामन्यात विजय मिळवण्यावर असणार आहे.

अशी असू शकते भारताची प्लेइंग-११: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

WhatsApp channel

संबंधित बातम्या