IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार का? असं आहे विशाखापट्टणमचं सध्याचं हवामान
ind vs aus 2nd odi weather report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची मजा (IND vs AUS vizag Weather Report) पावसामुळे खराब होऊ शकते. सामन्याच्या सुरुवातीला हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, परंतु कालांतराने त्यात बदल होऊ शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय (IND VS AUS 2nd ODI) सामना आज (१९ मार्च) विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्यांच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना खेळवला जाईल.
ट्रेंडिंग न्यूज
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान चाहते विशाखापट्टणममधील हवामानावरही लक्ष ठेवून आहेत. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. सामना सुरू असताना हवामना साफ असेल मात्र, सायंकाळच्यावेळी त्यात बदल होऊ शकतो. सायंकाळी ३ ते ५ वाजेदरम्यान पावसाची शक्यता आहे.
विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज
Accuweather नुसार हवेची गुणवत्ता चांगली असेल. सामन्यादरम्यान आर्द्रता ८१ टक्के आणि दवबिंदू ((Dew Point)) २१ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तसेच, सामन्यादरम्यान ७६ टक्के ढगांचे आवरण (क्वाउड कव्हर) अपेक्षित आहे. विशाखापट्टणममध्ये आज सकाळीही जोरदार पाऊस झाला. या क्षणाचे ताजे अपडेट म्हणजे पाऊस थांबला आहे आणि आकाशही निरभ्र झाले आहे. खेळ वेळेवर सुरू होईल अशी आशा आहे.
कमाल तापमान: २५°C
किमान तापमान: २३ अंश सेल्सिअस
पावसाची शक्यता: ८०%
ढगाळ: ७६%
वाऱ्याचा वेग: ३१ किमी/ता
भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर असेल नजर
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-११ वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार असल्याने भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-११ मधून कोणता खेळाडू बाहेर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांपैकी एकाला दुसऱ्या वनडेतून डच्चू मिळू शकतो. अशात सूर्या बाहेर बसण्याची शक्यता जास्त आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होत आहे. तसेच, इशान किशन मधल्या फळीत फलंदाजी करण्यात माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.
दुसऱ्या वनडेसाठी संभाव्य संघ
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर / ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
संबंधित बातम्या