मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: तीन वर्षांनी ७१ वं शतक झालं, पण विराट ‘या’ गोष्टीमुळं हैराण, जाणून घ्या

Virat Kohli: तीन वर्षांनी ७१ वं शतक झालं, पण विराट ‘या’ गोष्टीमुळं हैराण, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 09, 2022 12:18 PM IST

Virat Kohli Century: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. या शतकाची चाहते जवळपास तीन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, टी-20 फॉरमॅटमध्ये हे शतक येईल याची विराटला स्वत:लाही अपेक्षा नव्हती.

Virat Kohli
Virat Kohli

विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आता संपली आहे. कोहलीने आफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. कोहलीने ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक ठोकण्याची कोहलीची शैलीही शानदार होती. त्याने फरीद मलिकच्या गोलंदाजीवर डीप-मिडविकेटवर षटकार ठोकून शतक पूर्ण केले. दुबईत सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध हे शतक पूर्ण केले.

मात्र, या फॉरमॅटमध्ये आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण होईल, असे विराटलाही वाटले नव्हते. याचा खुलासा खुद्द विराटनेच सामना संपल्यानंतर केला आहे. तो म्हणाला की, तो ज्या पद्धतीने खेळला त्यामुळे तो स्वत:ही चकित झाला होता.

मला वाटले नव्हते मी टी-20 क्रिकेटमध्ये शतक करेन-

या शतकासह विराटने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. पाँटिंगच्या खात्यात ७१ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सामन्यानंतर विराट म्हणाला की, “या फॉरमॅटमध्ये आपण शतक झळकावू, अशी मला अपेक्षा नव्हती. या खेळीने मी स्वत:ही हैराण झाला आहे. तसेच, मोठे षटकार मारणे ही आपली ताकद नाही. टी-20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी फक्त षटकार मारणे आवश्यक नाही”.

सोबतच, “गेल्या अडीच वर्षांत मी खूप काही शिकलो आहे. मी एका महिन्यानंतर ३४ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे आक्रमक सेलिब्रेशन आता जुनी गोष्ट झाली आहे”, असेही विराट म्हणाला.

पत्नी अनुष्काचे कौतुक

विराटने हे ७१ वे शतक पत्नी अनुष्का शर्माला समर्पित केले आहे. तो म्हणाला की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. नोव्हेंबर २०१९ नंतर आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. या फॉरमॅटमध्ये मला शतकाची अपेक्षा नव्हती. जेव्हा मी संघात परतलो तेव्हा सर्वांनी माझे स्वागत केले. मी माझ्या गळ्यातील रिंगचे चुंबन घेतले. कारण अनुष्का शर्मा कठीण काळात माझ्या पाठीशी उभी राहिली. हे शतक तिचे आणि मुलगी वामिकाचे आहे".

WhatsApp channel

संबंधित बातम्या