अल्जेरियन महिला बॉक्सर इमाने खलीफ हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. शुक्रवारी (९ ऑगस्ट) इमान खलिफ हिने महिलांच्या ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अल्जेरियाची महिला बॉक्सर इमान खलिफ लिंग विवादामुळे खूप चर्चेत होती. इमान खलिफवर बायोलॉजिकल पुरूष असल्याचा आरोपही करण्यात आला होता. चीनच्या यांग लिऊविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात इमानने सुवर्णपदक जिंकले.
तथापि, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा विश्वास होता की तिने त्यांच्या मानकांची पूर्तता केली, ज्यामुळे तिला स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली.
पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या सामन्यांमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांच्या महिला बॉक्सर्सनी इमानविरोधात आवाज उठवला होता.
इमान खलिफाने राउंड ऑफ १६ फेरीचा सामना इटालियन बॉक्सर अँजेला कारिनीविरुद्ध खेळला. पण काही सेकंदातच या सामन्यातून इटालियन बॉक्सरने माघार घेतली होगी. यानंतर इमान खलिफने अंतिम फेरीपर्यंत तिचे सर्व सामने एकतर्फी जिंकले.
उपांत्यपूर्व फेरीत इमान खलिफचा सामना हंगेरीच्या लुका अण्णा हमारीशी झाला. या सामन्यात इमान खलिफाने ५-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर उपांत्य फेरीत अल्जेरियाच्या बॉक्सरने थायलंडच्या जँजेम सुवान्नाफेंगचा ५-० असा पराभव केला.
उपांत्य फेरीत नेत्रदीपक विजयाची नोंद करणाऱ्या इमान खलिफने अंतिम फेरीतही एकतर्फी विजय मिळवला. सुवर्णपदकासाठी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत इमानने चीनच्या यांग लिऊचा ५-० असा पराभव केला. अशाप्रकारे इमान खलिफने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वादाच्या भोवऱ्यात राहून सुवर्णपदक जिंकले.
इमान खलिफला २०२३ मध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून वगळण्यात आले होते. इमान चॅम्पियनशिपमध्ये लैंगिक पात्रता निकष पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली होती, त्यामुळे तिला बाहेर ठेवण्यात आले होते.