Kohli Gambhir Fight : गंभीर-विराटच्या वादात मध्यस्थी करण्यास तयार, भारताच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य-im ready to mediate resolve dispute between virat kohli and gautam gambhir in ipl 2023 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli Gambhir Fight : गंभीर-विराटच्या वादात मध्यस्थी करण्यास तयार, भारताच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

Kohli Gambhir Fight : गंभीर-विराटच्या वादात मध्यस्थी करण्यास तयार, भारताच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

May 03, 2023 08:02 PM IST

Virat Kohli vs Gautam Gambhir : आरसीबी आणि लखनौत झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती.

Virat Kohli vs Gautam Gambhir
Virat Kohli vs Gautam Gambhir (HT)

Ravi Shastri On Kohli Gambhir Fight : आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौत झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. त्यामुळं नाराज चाहते आणि अनेक माजी खेळाडूंनी कोहली-गंभीरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सुनील गावसकर, अनिल कुंबळे आणि रॉबिन उथप्पा यांनी देखील विराट-गंभीर यांच्यातील वादावादी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळं आता कोहली-गंभीर यांच्यातील वाद शमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटलं की, मला वाटतं की कोहली आणि गंभीर यांच्यातील वाद एक ते दोन दिवसांत शांत होईल. हे प्रकरण आणखी चांगल्या पद्धतीनं हाताळता आलं असतं, हे त्यांच्या लक्षात येईल. कोहली आणि गंभीर यांनी दिल्लीसाठी अनेक वर्षे क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळं त्यांची संमती असेल तर मी त्यांच्या वादात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. भारताने जिंकलेल्या दोन विश्वचषक स्पर्धेत गौतम गंभीरने भारताचं नेतृत्व केलेलं आहे. विराट कोहली क्रिकेटचा आयकॉन आहे. त्यामुळं दोन्ही खेळाडूंनी समोरा-समोर बसून हा वाद मिटवायला हवा, असंही शास्त्री म्हणालेत.

LSG vs CSK IPL 2023 : चेन्नई-लखनौतील सामना पावसामुळं रद्द, धोनीची बॅटिंग पाहता न आल्याने चाहत्यांचा हिरमोड

लवकरात लवकर वाद मिटवणं हे कोहली आणि गंभीर यांच्यासाठी चांगलं राहणार आहे. कारण वाद कायम राहिला तर हे खेळाडू जेव्हा-जेव्हा भेटतील त्यांच्यात वाद होत राहणार आहे. त्यामुळं पुढे चालून गोष्टी आणखी बिघडू शकतात. एका वादामुळं दुसरा वाद निर्माण होत असतो. त्यामुळं आता या खेळाडूंमधील वाद मिटवायचा असेल तर मी मध्यस्थी करायला तयार असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner