मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ICC New Criceket Rules: आता क्रिकेट होणार अधिक वेगवान; ICC नं लागू केले 'हे' नवे नियम

ICC New Criceket Rules: आता क्रिकेट होणार अधिक वेगवान; ICC नं लागू केले 'हे' नवे नियम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 20, 2022 01:26 PM IST

ICC New Criceket Rules: सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीने महिला क्रिकेट समितीशी या नियमांबाबत चर्चा केली. या नियमांमध्ये काही बदल करुन ते नव्याने लागू केले जाणार आहेत. नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. क्रिकेटमधील हे नवे नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) बनवले आहेत.

ICC New Criceket Rules
ICC New Criceket Rules

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता लाळेच्या वापरावर कायमची बंदी घालण्यात आली आहे.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीने महिला क्रिकेट समितीशी या नियमांबाबत चर्चा केली. या नियमांमध्ये काही बदल करुन ते नव्याने लागू केले जाणार आहेत. नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. क्रिकेटमधील हे नवे नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) बनवले आहेत.

कॅच आउट नियम: नव्या नियमानुसार फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवा फलंदाजच स्ट्राईकवर येणार आहे. यापूर्वीच्या नियमात झेलबाद होण्यापूर्वी फलंदाजाने जर क्रीझ सोडली असेल तर नॉन स्ट्राईकवरील फलंदाज स्ट्राईक घेऊ शकत होता. मात्र, आता नव्या नियमानुसार नवीन फलंदाजच स्ट्राईकवर येणार आहे.

लाळेचा वापर: कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात क्रिकेट बंद झाले. मग पुन्हा खेळ सुरू करण्यासाठी काही नवीन नियम करण्यात आले. यामध्ये लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

मात्र आता क्रिकेट समितीने लाळेच्या वापरावर कायमची बंदी घातली आहे. म्हणजेच आता क्रिकेटमध्ये लाळेच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहणार आहे. हा नियम आता कायमस्वरूपी होणार आहे.

९० सेकंदात क्रीझवर यावे लागेल: फलंदाज बाद झाल्यानंतर नवा खेळाडू वनडे आणि टेस्टमध्ये २ मिनिटांच्या आत क्रिझवर आला पाहिजे. टी-२० क्रिकेटमध्ये ही वेळ ९० सेंकद निश्चित करण्यात आली आहे. जर फलंदाज या वेळेत क्रीझवर पोहोचू शकला नाही तर विरोधी संघाचे खेळाडू आऊटचे अपील करु शकणार आहेत. पूर्वी ही वेळ ३ मिनिटे होती.

गोलंदाजाकडून रनअप दरम्यान असभ्य वर्तन: गोलंदाजाने गोलंदाजी (रनअप) दरम्यान काही अयोग्य वर्तन केले किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल केली, तर पंच त्यावर कारवाई करू शकतात. या नियमात अंपायर ५ धावांची पेनल्टीही लावू शकतात.  तसेच, अंपायर तो चेंडू डेड बॉलही घोषित करु शकतील.

मांकडिंग नियम: गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला क्रीझमधून बाहेर येता येणार नाही. गोलंदाजाच्या हे लक्षात आले आणि त्याने चेंडूने बेल्स उडवल्या तर त्याला मांकडिंग नियामाद्वारे रनआऊट करता येऊ शकणार आहे.

इन-मॅच पेनल्टी नियम: हा नियम जानेवारी २०२२ मध्ये T20 मध्ये लागू करण्यात आला होता. आात हा नियम एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील लागू होणार आहे. हा नियम २०२३ विश्वचषकापासून लागू होईल.

इन-मॅच पेनल्टी नियय काय आहे- गोलंदाजी करणाऱ्या संघाला निर्धारित वेळेतच संपूर्ण ओव्हर्स टाकाव्या लागतील. जर ते त्या वेळेत संपूर्ण षटके संपवू शकले नाहीत तर त्या वेळेपासून इंनिंग संपेपर्यंत एक फिल्डर सीमारेषेवरुन हटवून सर्कलच्या आत ठेवावा लागेल. 

WhatsApp channel