मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neeraj Chopra : नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम मालामाल! वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर किती पैसे मिळाले? पाहा

Neeraj Chopra : नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम मालामाल! वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर किती पैसे मिळाले? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 28, 2023 05:26 PM IST

Neeraj Chopra Prize Money , World Athletics Championships : भारताचा अनुभवी खेळाडू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमला रौप्य पदक जिंकण्यात यश आले.

Neeraj Chopra Prize Money
Neeraj Chopra Prize Money (AP)

World Athletics Championships : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. त्याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आहे. नीरजने ८८.१७ मीटरचा गोल्डन थ्रो केला. 

ट्रेंडिंग न्यूज

त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्यपदक पटकावले. नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८८.१७ मीटरसह तिसऱ्या प्रयत्नात ८६.३२ मीटर, चौथ्या प्रयत्नात ८४.६४ मीटर, पाचव्या प्रयत्नात ८७.७३ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३.९८ मीटर अंतर पार केले. त्याचा प्रयत्न फाउल ठरला होता.

 दरम्यान, नीरज चोप्राला अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर किती बक्षिस रक्कम मिळाली? हे तुम्हाला माहिती आहे का?

नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांना किती पैसे मिळाले?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रावर पैशांचा पाऊस पडला. अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला बक्षीस म्हणून ७० हजार डॉलर्स मिळाले. ही किंमत भारतीय रुपयात मोजली तर अंदाजे ५८ लाख रुपये होतात. 

त्याचवेळी अ‍ॅथलेटिक्स  चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ३५ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे २९ लाख रुपये मिळाले.

नीरज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र

विशेष म्हणजे, नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक (२०२१), आशियाई खेळ (२०१८), राष्ट्रकुल खेळ (२०१८) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यासोबतच नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींसह देशातील प्रसिद्ध व्यक्तींनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. वास्तविक, जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय आहे.

WhatsApp channel