फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो याने त्याचे नवीन YouTube चॅनेल 'UR - Cristiano' सुरू केले. या यूट्यूब चॅनलने पहिल्याच दिवशी खळबळ माजवली आणि अनेक रेकॉर्ड बनवले.
खरं तर, आधीच सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आता यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या दिग्गज फुटबॉलपटूने त्याच्या यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओही अपलोड केले आहेत. त्याचे बहुतेक व्हिडिओ एका मिनिटापेक्षा कमी वेळेचे असले तरी, त्याच्या चॅनेलने एका फुटबॉल सामन्यापेक्षाही कमी वेळेत १ मिलियन्स सब्सक्राइबर्स मिळवले आहेत.
क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून किती कमाई करत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? या दिग्गज फुटबॉलपटूने अवघ्या २ दिवसांत १२ व्हिडिओ अपलोड केले आहेत. असे मानले जाते की यूट्यूबवर १० मिनिटांचे व्हिडिओ सर्वाधिक प्ले केले जातात, परंतु रोनाल्डोच्या जादूमुळे त्याचे छोटे व्हिडिओ देखील लाखो व्ह्यूज मिळवत आहेत.
Viewstats च्या रिपोर्टनुसार, ही बातमी लिहिपर्यंत रोनाल्डोच्या व्हिडिओला १२१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, क्रिस्टियानो रोनाल्डोची कमाई अंदाजे ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात असेल.
दरम्यान, आतापर्यंत क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनेलचे ३ कोटींहून अधिक सब्सक्राइबर झाले आहेत. या दिग्गज फुटबॉलपटूने त्याचा मुलगा क्रिस्टियानो ज्युनियर आणि पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओंमध्ये, तो त्याचे युरो गोल रँक करतो, फ्रीकिक चॅलेंज पूर्ण करतो आणि 'This or That' सारखे गेम खेळताना दिसतो आहे. असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.