Neeraj Chopra Wife : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा १७ जानेवारीला विवाहबद्ध झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजच्या लग्नाला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी मोर असून ती सोनीपतची रहिवासी आहे. नीरज चोप्राचे काका भीम यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, त्यांच्या पुतण्याचे लग्न भारतातच झाले असून दोघेही आता हनिमूनला गेले आहेत.
नीरज चोप्रा याची पत्नी हिमानी मोरे सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे. हिमानी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून स्पोर्ट्स मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. अशा परिस्थितीत नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर हिचे शिक्षण किती झाले आहे हे जाणून घेऊया.
नीरज चोप्राप्रमाणेच हिमानी मोर ही खेळाडूंच्या कुटुंबातून येते. तिचे सुरुवातीचे शिक्षण लिटल एंजल स्कूलमधून झाले. यानंतर हिमानीने दिल्ली विद्यापीठाच्या प्रसिद्ध मिरांडा हाऊस कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी पूर्ण केली.
हिमानीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती सध्या ॲमहर्स्ट कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट असिस्टंट म्हणून महिला टेनिस संघाची मॅनेजर आहे. याशिवाय हिमानी मॅककॉर्मिक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून या क्षेत्रात एमएस करत आहे. हिमानी स्पोर्टस मॅनेजमेंटमध्ये स्कील डेव्हलपमेंटचे काम करत आहे.
अभ्यासासोबतच हिमानी राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राहिली आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशन (AITA) च्या वेबसाइटनुसार, हिमानीने २०१८ मध्ये एकेरीमध्ये ४२ वे आणि दुहेरीत २७ वे स्थान मिळवले होते. तिने २०१८ मध्येच एआयटीए स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या