मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Salary : दुखापतग्रस्त खेळाडूंना पगार मिळतो का? ऋषभ पंत आणि विल्यमसनला किती पैसे मिळणार? पाहा

IPL Salary : दुखापतग्रस्त खेळाडूंना पगार मिळतो का? ऋषभ पंत आणि विल्यमसनला किती पैसे मिळणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 03, 2023 06:12 PM IST

IPL Salary Structure : काही आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना हंगाम सुरू होण्याआधीच पूर्ण रक्कम देतात. तर काही संघ असे आहेत जे सुरुवातीला अर्धी रक्कम देतात आणि उर्वरित रक्कम स्पर्धेच्या शेवटी देतात.

IPL Salary Structure
IPL Salary Structure

IPL Players Payment System : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) कोणताही हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगामादरम्यान अनेक खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागते. क्रिकेटच्या या सर्वात महागड्या T20 लीगमधून कोणताही खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर पडणे हा मोठा धक्का मानला जातो. जर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या पेमेंटचे काय होते? हा प्रश्नही अनेक चाहत्यांना पडतो.

जर एखादा खेळाडू त्याच्या फ्रँचायझीसाठी सर्व सामन्यांमध्ये उपलब्ध असेल तर त्याला पूर्ण पैसे मिळतात. लिलावात ठरलेली पूर्ण रक्कम खेळाडूला दिली जाते. मात्र, हे पेमेंट खेळाडूला कसे द्यायचे हे फ्रँचायझी ठरवते.

काही आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना हंगाम सुरू होण्याआधीच पूर्ण रक्कम देतात. तर काही संघ असे आहेत जे सुरुवातीला अर्धी रक्कम देतात आणि उर्वरित रक्कम स्पर्धेच्या शेवटी देतात.

दुसरीकडे, दुखापतग्रस्त खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पेमेंटबाबत वेगळी प्रक्रिया अवलंबली जाते.

ऋषभ पंतला मानधन मिळणार नाही

आयपीएल हंगाम सुरू होण्याआधीच जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला, तर त्याला फ्रँचायझीकडून कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जात नाहीत. ऋषभ पंतला या हंगामासाठी फ्रेंचायझीकडून कोणतीही रक्कम मिळणार नाही. कारण तो खूप पूर्वीपासून दुखापतग्रस्त आहे.

केन विल्यमसनला पूर्ण पैसे मिळणार

तर दुसरीकडे, एका सामन्यानंतर संपूर्ण हंगामातून बाहेर पडलेल्या केन विल्यमसनला (williamson ipl) फ्रँचायझीकडून वैद्यकीय खर्चासह त्याचे संपूर्ण मानधन दिले जाईल, कारण खेळाडू आयपीएल सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. आयपीएलमध्ये दुखापत झाली असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी फ्रेंचायझी घेते.

याशिवाय, काही खेळाडू फ्रँचायझीसाठी मर्यादित सामने खेळण्यासाठी उपलब्ध असल्यास, त्यांना सामन्यांच्या संख्येनुसार पैसे दिले जातात. चेन्नई सुपर किंग्जचा बेन स्टोक्स संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसल्याचा दावा अनेक अहवालात केला जात आहे. अशा परिस्थित तो जेवढे सामने खेळेल त्यानुसार त्याला पैसे दिले जातील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या