आशिया कप 2023 चा पहिला सामना ३० ऑगस्टला होईल, तर अंतिम सामना १९ सप्टेंबरला होईल. यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. म्हणजेच एकूण १३ सामन्यांपैकी ४ सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर अंतिम सामन्यासह उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
पण चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की आशिया कप कधी, कसा आणि कोणत्या परिस्थितीत सुरू झाला असेल? आशिया चषकाची सुरुवात अगदी अनोख्या पद्धतीने झाली. याची संपूर्ण स्टोरी जाणून घेतल्यावर, तुम्ही असेही म्हणू शकता की आशिया कप रागाच्या भरात आणि बदला घेण्याच्या हेतूने सुरू केला गेला होता.
वास्तविक, आशिया चषक १९८४ मध्ये सुरू झाला. त्याचे असे झाले की एनकेपी साळवे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष होते. विस्डेनच्या म्हणण्यानुसार, साळवे यांना २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्सवर झालेली पहिल्या वनडे वर्ल्डकपची फायनल स्टेडियमधून पाहायची होती. मात्र त्यावेळी त्यांना तिकीट मिळाले नाही.
यामुळे संतापलेल्या साळवे यांना राग अनावर झाला. मात्र त्यांनी आपला राग वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. साळवे यांनी ठरवले की आता आपण विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर घेऊन जायचा. पण हे काम तितके सोपे नव्हते. हे साळवेंनाही चांगलेच ठाऊक होते.
त्यासाठी साळवे यांनी पूर्ण ताकद लावली. त्यानी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन नूर खान यांच्याशी बोलून त्याला सोबत घेतले. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (SLC) प्रमुख गामिनी दिसानायके यांनी सोबत घेण्यात आले. १९ सप्टेंबर १९८३ रोजी नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ची स्थापना झाली.
या संघटनेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूरचा यांचाही समावेश झाला. त्यावेळी फक्त भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका आयसीसीचे पूर्ण सदस्य होते. यानंतर आशियामध्ये एसीसीची स्थापना झाल्यानंतर क्रिकेटची शक्ती विभागली गेली. यापूर्वी संपूर्ण सत्ता फक्त आयसीसीकडे होती. एक प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की एसीसीने क्रिकेटमध्ये आयसीसीला आव्हान देण्यास सुरुवात केली.
एसीसी स्थापन झाल्यानंतर त्यांनी आशिया कप स्पर्धा सुरू करून आयसीसीला पहिले आव्हान दिले. या स्पर्धेत फक्त आशियाई संघांना खेळण्याची परवानगी होती. आशिया चषकाचा पहिला मोसम १९८४ मध्ये आयोजित करण्यात आला. हा पहिला सीझन ODI फॉरमॅटमध्ये खेळला गेला, जो UAE मध्ये खेळला केला होता. हा पहिला मोसम भारतानेच जिंकला होता. तेव्हापासून या स्पर्धेत फक्त टीम इंडियाच वर्चस्व गाजवत आहे. अशा स्थितीत एनकेपी साळवे यांचा राग आणि बदला घेण्याच्या इराद्यामुळे आशिया चषकाची सुरुवात झाली असे म्हणता येईल.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत आशिया चषकाचे १५ हंगाम झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळा चॅम्पियन ठरला आहे. श्रीलंका ६ वेळा आणि पाकिस्तानला केवळ दोनदा (२०००, २०१२) विजेतेपद मिळवता आले.
संबंधित बातम्या