भारतीय स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरली आहे. विनेशने ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत विनेशचा सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिच्याशी होणार होता, मात्र सामन्यापूर्वीच विनेश फोगाट पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरली आहे.
वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. विनेशचे वजन काही ग्रॅम जास्त होते. यामुळे आता ती अंतिम सामन्यासाठी मॅटवर येणार नाही. याहून निराशाजनक बाब म्हणजे भारताच्या या चॅम्पियन कन्येला एकही पदक मिळणार नाही.
अशा परिस्थितीत आता विनेश फोगटचे वजन काही तासांतच कसे काय वाढले, असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. कारण काल मंगळवारी (६ ऑगस्ट) विनेशेने तीन सामने खेळले होते, त्यावेळी तिचे वजन बरोबर होते. पण आता काही तासात विनेशचे वजन कसे वाढले? ते जाणून घेऊया.
कोणत्याही कुस्तीपटूसाठी त्याचा आहार सर्वात महत्त्वाचा असतो. रेसलरच्या खाण्याच्या सवयी इतर लोकांपेक्षा वेगळ्या असतात. कुस्तीपटूंना अधिक कॅलरीज सेवन कराव्या लागतात, जेणेकरुन तो आपला स्टॅमिना टिकवून ठेवू शकेल आणि त्याच्या स्पर्धेत त्याचे शंभर टक्के देऊ शकेल.
तथापि, हेच काहीवेळा समस्या निर्माण करते. विनेश फोगटच्या बाबतीतही हेच घडले असावे. कुस्तीपटूंना सहसा जास्त कॅलरी आहार घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत जर कॅलरी निर्धारित मर्यादेपेक्षा थोडी जास्त झाली तर वजन वाढण्याचा धोका असतो.
अनेक वेळा असंही घडतं की, जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा वजन अचानक वाढते. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळेही शरीराच्या स्नायूंमध्ये बदल दिसून येतात.
रिपोर्टनुसार, मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री विनेशने वजन कमी करण्यासाठी रात्रभर जॉगिंग आणि सायकलिंग केली. या सगळ्यांमध्ये ती खूप तणावाखाली असू शकते, त्यामुळे विनेशचे वजन वाढले असावे.